Horoscope In Marathi : पार्टनरच्या शोधात आहात? 'या' राशीच्या लोकांचं नशीब खुलणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Today Horoscope In Marathi
23 September 2024 Astrology
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' राशीच्या लोकांना टेन्शन घ्यायची गरज नाही

point

'या' राशीच्या लोकांच्या संपत्तीत होईल वाढ

point

'या' राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत सतर्क राहा

23 September 2024 Horoscope :  वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. हिंदू पंचागानुसार, 23 सप्टेंबर 2024 ला सोमवार आहे. हिंदू धर्मात सोमवारच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. भोलेनाथाची पूजा केल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिष गणनेनुसार, 23 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असेल, तर काही राशींसाठी सामान्य स्वरुपाचा राहील. 23 सप्टेंबरचा दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे आणि कोणाला सावध राहण्याची आवश्यकात आहे, याबाबत बाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ADVERTISEMENT

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यवसायीक कामात शुभ राहील. कुटुंबातील समस्या दूर होतील. भौतिक सुख सुविधा मिळू शकतात. कुटुंबासोबत पिकनिकला जाऊ शकता. आरोग्य उत्तम राहील.

हे वाचलं का?

वृषभ राशी

महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबीक जीवनात सुख शांती नांदेल. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळू शकते. 

ADVERTISEMENT

मिथुन राशी

ADVERTISEMENT

आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. कार्यालयात प्रचंड मेहनत घेतल्यानं यश मिळेल. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत पिकनीकला जाऊ शकता. प्रेम प्रकरणाला वेगळं वळण लागेल.

कर्क राशी

आज कर्क राशीच्या लोकांना जुन्या गूंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. व्यवसायीक जीवनात जे लोक उच्च पदावर आहेत, त्यांना कामकाजात सावध राहावं लागेल. कुटुंबासोबत पिकनीकला गेल्यावर आनंदाचे क्षण घालवू शकता. आज पार्टनरसोबत स्पेशल प्लॅन करू शकता. 

सिंह राशी 

आज कार्यालयात तुमच्या कौशल्याचं कौतुक केलं जाईल. घरात धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाऊ शकतं. काही लोकांना घरभाडे मिळून आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यापारात फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या राशी

आज कन्या राशीच्या लोकांना नवीन उद्योगामुळं आर्थिक फायदा होईल. कार्यालयात खूप सावध राहून काम करावं लागेल. नवीन संपत्ती खरेदी करण्याची खूप चांगला दिवस आहे. कौटुंबीक जीवन सुखी राहील.

तुळा राशी

आज तुळा राशीच्या व्यक्तींना उद्योगातून खूप मोठा फायदा होईल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवाल. प्रवासाचा योग बनू शकतो. उद्योगधंद्याबाबत गुड न्यूज मिळेल. 

हे ही वाचा >> IND vs BAN: इंडिया WIN! पण अश्विनने मोडला 'या' दिग्गज खेळाडूचा विक्रम, 3 मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आरोग्याबाबत असणाऱ्या अडचणी दूर होतील. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. आज तुम्ही नवीन उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करू शकता. 

धनु राशी

दान करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ होईल. नातेसंबंधात अहंकार आणू नका. विद्यार्थ्यांना ताण येऊ शकतो. 

मकर राशी 

आजचा दिवशी चढ-उतार पाहायला मिळू शकतात. व्यावसायीक जीवन थोडं आव्हानात्मक राहील. प्रवासाचा योग बनेल. आरोग्याची काळजी घ्या. हेल्दी लाईफस्टाईलने राहा. सकस आहार करा. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही चांगलं राहील.

कुंभ राशी

आज घरात सुरु असलेले वादविवाद मिटतील. समाजात मान सन्मान मिळेल. सासरच्या माणसांकडून सहकार्य मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल.

मीन राशी

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहील. मानसिक ताणतणाव जाणवू शकतो. करिअरच्या बाबतीत चिंता राहील. गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. 

टीप - राशी भविष्याबाबत दिलेल्या माहितीची मुंबई तक कोणत्याही प्रकारे पुष्टी करत नाही. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT