Cabbage tapeworm : कोबीमुळे मेंदूत किडे घुसतात? डॉक्टरांनी सांगितलं तरी काय?
आहार तज्ज्ञांकडून पालेभाज्या खाण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. मात्र काही पालेभाज्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हानीकारक ठरत असतात. त्यापैकीच एक म्हणजे कोबी. कोबीच्या भाजीवरही काही गोष्टीमुळे वाईट परिणाम होतो मात्र त्याचा थेट परिणाम कधी कधी तुमच्या मेंदूवरही होत असतो.
ADVERTISEMENT

Cabbage dangerous tapeworm : हिवाळ्याची सुरुवात झाली की, हिरव्या पालेभाज्यांची मागणी वाढू लागते. या हंगामात कोबी खाण्याचेही प्रमाण वाढते. कारण त्याचे काही फायदेही सांगितले जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून अशा काही गोष्टी समोर येत आहेत की, कोबी खाल्ल्याने त्यातील जंत मेंदूपर्यंत (brain) पोहोचत असतात, आणि ते आरोग्याला हानी (Health Loss) पोहचतवात. मात्र कोबी उकळल्यानंतरही त्यातील जंत निघत नाहीत, तर त्याचा परिणाम हा तुमच्या मेंदूवर होत असतो. मेंदूतील कृमींमुळे होणाऱ्या त्या अवस्थेला वैद्यकीय भाषेत न्यूरोसिस्टीरकोसिस असंही म्हणतात.
जंत अन्नासह जातात पोटात
आहार तज्ज्ञांकडून असाही दावा केला जातो की, कोबी योग्य प्रकारे शिजवली गेली नाही, ती तशीच खाल्ली तर त्यातील टेपवर्म शरीरात प्रवेश करू शकतात, आणि ते प्राणघातकही ठरू शकतात. कोबीतील जंत अन्नासह पोटात जाऊन नंतर ते आतड्यामध्ये प्रवेश करतात व रक्त प्रवाहाच्या माध्यमातून ते मेंदूपर्यंत जातात. त्यामुळे अनेक जण त्यावर उपाय म्हणून अनेक जण कोबी खाणे टाळत असतात. हे असं सांगितले जात असले तरी त्यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी काही डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांना विचारले की, कोबीमध्ये खरच जंत असतात का आणि असले तर किती घातक असू शकतात. त्यावर डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.
टेपवर्म म्हणजे काय?
टेपवर्म एक सपाट, परजीवी जंत आहे. विविध प्राण्यांमधून हे संक्रमित करत असतात, त्यामुळे प्राणी आणि माणसाच्या आतड्यांमध्येही ते आढळतात. टेपवर्म्स हे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळून येतात. त्यामुळे तुम्ही खाता त्यातील पोषक तत्व त्यांना मिळत असते. मानवी शरीराली मिळालेल्या पोषक तत्वांची जंतमुळे कमतरता जाणवू लागली की, मळमळ, अशक्तपणा, अतिसार आणि थकवा यांसारखी लक्षणे तुम्हाला दिसू लागतात.
पोषक घटकांचे शोषण
मांस खाणारे जे सस्तन प्राणी आहेत ज्याप्रमाणे माणूस, मांजर आणि कुत्र्यांचाही त्यामध्ये समावेश होतो. टेपवर्म प्राणी किंवा मनुष्याच्या शरीरातील पोषक घटक खाऊ शकतात. टेपवर्मचे डोके मनुष्याच्या किंवा प्राण्यांच्या आतड्यांशी जोडलेले असते. त्यामुळे त्या पचलेल्या अन्नातून पोषक द्रव्ये ते शोषून घेत असतात.