Dhanteras 2023 : भगवान धन्वंतरीची ‘अशी’ करा पूजा, जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजा विधी

ADVERTISEMENT

dhanteras 2023 know about date time and shubh muhurt puja vidhi dhanvantari puja vidhi diwali 2023
dhanteras 2023 know about date time and shubh muhurt puja vidhi dhanvantari puja vidhi diwali 2023
social share
google news

Dhanteras 2023 Puja Vidhi, Shubh Muhurt : देशात 10 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे. दरवर्षी दिवाळी ही 5 दिवसांची असते. पण यदांच्या वर्षी सहा दिवसांची दिवाळी साजरी केली जाणार आहे. यामागे एक महत्वाचे कारण आहे. या सोबत दिवाळीच्या पहिल्या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते. त्यामुळे या पुजेचा विधी आणि शुभमुहूर्त जाणून घेऊयात.(dhanteras 2023 know about date time and shubh muhurt puja vidhi dhanvantari pooja vidhi)

दिवाळीच्या पहिल्या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी धन्वंतरीची पूजा केली जाते. दिवाळीपूर्वी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीचा सण खूप खास असतो. हा उत्सव शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.

हे ही वाचा : Shiv Sena : शिंदेंच्या नेत्यांमध्येच कुस्ती, कदमांविरोधात कीर्तिकरांनी थोपटले दंड

धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती 13 पटीने वाढते. यामुळे लोक या दिवशी भांडी, सोने, चांदी, कपडे, घर, वाहन अशा वस्तू खरेदी करतात. धनत्रयोदशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात समृद्धी येते. या दिवशी सोने-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शुभ मुहूर्त कधी?

धनत्रयोदशीच्या पूजेच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायच झालं तर धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:47 ते 7:47 पर्यंत 2 तासांचा असणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावले जातात अशीही एक मान्यता आहे. धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये लक्ष्मी, गणेश धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. या पूजेमध्ये फुलांच्या माळा आणि पिठाची खीर सोबत गूळ, कोथिंबीर किंवा बुंदीचे लाडूही अर्पण केले जातात. दिवाळीपूर्वी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीचा सण खूप खास असतो.

हे ही वाचा : Maratha Reservation : …तर फडणवीसांच्या थेट गळ्यातच पडतो, जरांगे पाटील काय म्हणाले?

सहा दिवसांची दिवाळी

दरवर्षी दिवाळी सण हा 5 दिवसांचा साजरा केला जातो. पण यंदाच्या वर्षी दिवाळीचा सण 5 ऐवजी 6 दिवस असणार आहे. धनत्रयोदशीचा सण शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. नरक चतुर्दशीचा सण शनिवार, 11 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. लक्ष्मीपूजन रविवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. सोमवार 13 रोजी सोमवती अमावस्या साजरी होणार आहे. 14 मंगळवारी गोवर्धन पूजा तर 15 नोव्हेंबरला भाऊ बीज साजरी केली जाणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT