Flipkart Sale 2024 : फक्त 'इतक्या' हजारात मिळतोय Iphone 15, TV वरही मिळतेय बंपर सूट; पाहा ऑफर्स
Flipkart Big Billion Days Sale 2024 : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक सेल सूरू झाले आहेत. आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल 2024 घेऊन आली आहे. या सेलमध्ये टीव्ही (TV) आणि होम अप्लायन्सेसवर (Home Appliance) 50 ते 80 टक्के तर कपड्यांवर 60 ते 90 टक्के सूट देण्यात आली आहे.तर स्मार्टफोनवर (Smartphone) 80 टक्के सूट दिली आहे. यासोबत तुम्हाला बँकांकडून (Bank Discount) देखील अनेक डिस्काऊंट दिले जाणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक सेल सूरू झाले आहेत.
परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार
ग्राहकांची लॉटरी लागणार आहे
Flipkart Big Billion Days Sale 2024 : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अनेक सेल सूरू झाले आहेत. आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल 2024 घेऊन आली आहे. या सेलमध्ये टीव्ही (TV) आणि होम अप्लायन्सेसवर (Home Appliance) 50 ते 80 टक्के तर कपड्यांवर 60 ते 90 टक्के सूट देण्यात आली आहे.तर स्मार्टफोनवर (Smartphone) 80 टक्के सूट दिली आहे. यासोबत तुम्हाला बँकांकडून (Bank Discount) देखील अनेक डिस्काऊंट दिले जाणार आहेत. त्यामुळे अगदी परवडणाऱ्या किंमतीत तुम्हाला स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर गँजेट खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची लॉटरी लागणार आहे. (flipkart big billion days 2024 check deals discount and bank offers flipkart sale 2024)
ADVERTISEMENT
फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल 2024 हा सेल आज रात्री 12 वाजल्यापासून सर्वसामान्यांसाठी सूरू होणार आहे. तर Flipkart Plus आणि VIP सदस्यत्व असलेल्या ग्राहकांसाठी हा सेल आताच लाईव्ह सूरू आहे. या सेलदरम्यान प्रत्येक वस्तूंवर सूट, बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस सारख्या ऑफर देण्यात आल्या आहेत. या डील्स नेमक्या काय आहेत? त्या जाणून घेऊयात.
बँक ऑफर्स
फ्लिपकार्ट सेल दरम्यान, ग्राहकांना HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच, Flipkart Axis Bank कार्डधारकांना सेल दरम्यान 5% ची अमर्यादित सूट मिळेल. यासोबतच कंपनी निवडक उपकरणांवर एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : India Today Conclave: ' NCP ला सोबत घेणं आमच्या मतदारांना अजिबात आवडलं नाही', फडणवीस हे काय बोलून गेले
या वस्तूंवर 'इतके' टक्के सूट
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज दरम्यान, कंपनी विविध श्रेणींमध्ये बंपर सूट देत आहे. सेल दरम्यान, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर 50 ते 80 टक्के सूट उपलब्ध आहे. यासह, फॅशन श्रेणीमध्ये 60 ते 90 टक्के सवलत उपलब्ध आहे. त्याच वेळी, स्मार्ट उपकरणांवर 80 टक्क्यांपर्यंत ऑफर उपलब्ध आहेत.
स्मार्टफोनवर बेस्ट डील
मोबाईलवरील ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 Pro हा 89,999 रुपयात, iPhone 15 हा 49,999 रुपयांना आणि iPhone 15 Plus हा 59,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तर Samsung Galaxy S23 Rs 37,999 मध्ये आणि Galaxy S23 FE हा 27,999 मध्ये खरेदी करता येईल. Google Pixel 8 सेल दरम्यान हा 31,999 मध्ये आणि Nothing Phone 2a हा 18,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Amazon Great Indian Festival Sale 2024 : स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर छप्परफाड सूट, आताच करा खरेदी नाहीतर...
सेल दरम्यान, तुम्ही Samsung S24 हा स्मार्टफोन 64,999 मध्ये आणि Google Pixel 7a हा 25,999 मध्ये खरेदी करू शकता. त्याचवेळी, Pixel 9 हा 64,999 मध्ये आणि Pixel 9 Pro XL हा 1,00,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तुम्ही Redmi Note 13 हा 14,999 मध्ये आणि Pixel 9 Pro Fold हा 1,44,999 मध्ये खरेदी करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT