Ladka Bhau Yojana Rules : 'लाडका भाऊ योजने'चे नियम आहेत कडक, छोटी चूकही पडेल महागात
Ladka bhau yojana maharashtra in marathi : लाडका भाऊ योजनेतंर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या काळात त्यांना विद्यावेतनही देण्यात येणार आहे. या योजनेचे नियम खूप कडक आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती

लाडका भाऊ योजनेचे नियम काय आहेत?

उमेदवाराला कोणते नियम पाळणे अनिवार्य आहे?
Ladka bhau yojana rules in Marathi : लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत बारावी, पदवी, पदव्युत्तर सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाणार असून, विद्यावेतन दिले जाणार आहे. पण, विद्यावेतन मिळण्यासाठी उमेदवारांना काही नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहे. (ladka bhau yojana terms and conditions in marathi)
लाडका भाऊ योजनेचे पैसे मिळण्यासाठी नियम काय?
-प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थीची दररोज हजेरी संबंधित उद्योगाकडून घेण्यात येईल. ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षिणार्थीच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
- विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व रजा यांचा अंतर्भाव असेल. उद्योजक उमेदवारांना विद्यावेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल, तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरुपात देऊ शकेल.
हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील!
- प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त गैरहजर असला, तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन दिले जाणार नाही.