Ladki Bahin Yojana : तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट, आता पुढे काय होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme 50 lakh women application reject mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट (Form Reject) झाल्याची माहिती समोर आली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट

point

फॉर्म रिजेक्ट झालेल्यांना आणखी एक संधी

point

सप्टेंबरमध्ये पुन्हा अर्ज करता येणार

Mukhymantri ladki bahin yojana scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात 3000 जमा होत आहेत. असे असतानाच आता तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट (Form Reject) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिजेक्ट झालेल्या अर्जदारांचे पुढे काय होणार? रिजेक्ट झालेल्या महिलांना पैसे मिळणार का? हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme 50 lakh women application reject mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)  

दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 3000 जमा झाले आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. अशात आता तब्बल 50 हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही आहेत. पण तरीही त्या महिलांना एका सुवर्णसंधी देण्यात आली आहे. 

हे ही वाचा : Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...

सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार 

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे त्या महिलांना दिलासा मिळाला आहे. पण या महिलांना मोठा धक्का देखील बसणार आहे.  कारण ज्या महिलांना सप्टेंबरआधी अर्ज करता आला नाही आहे,  त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा निधी म्हणजेच 3000 रूपये मिळणार नाहियेत. त्यामुळे त्या महिलांना मोठा धक्का बसणार आहे. जर त्या महिलांनीच आधीच अर्ज केले असते, तर त्यांना 3000 रूपयाच्या लाभापासून मुकावे लागले नसते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी गडचिरोलीमध्ये म्हटले आहे. 

हे ही वाचा : Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले

तसेच 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT