Ladki Bahin Yojana : आजच भरून घ्या अर्ज..., 3000 मिळवण्यासाठी उरले शेवटचे काही तास!
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वच महिलांना घेता यावा, यासाठी सरकारने वेळोवेळी अर्जाच्या अटी आणि अर्जाची मुदत वाढवली आहे. लाडकी बहीण योजनेत याआधी 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र कागदपत्राची जुळवाजुळव आणि सरकारी कार्यालयातील महिलांची गर्दी पाहता सरकारने योजनेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार?
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख काय?
महिलांचा आजच अर्ज दाखल करण्यावर भर
Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्जाची अंतिम मुदत ही 31 ऑगस्ट 2024 असल्याचा अनेक महिलांचा समज झाला आहे. त्यामुळे या महिलांनी आजच अर्ज भरण्याचा चंग बांधला आहे. कारण त्या महिलांच्या मते लाडकी बहीण योजनेत (Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme) अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत आहेत. पण आज खरंच शेवटची तारीख आहे का? लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत (Application last Date) काय? चला जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme what was the last date of applicatiom submit mukhymantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde read full story)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्वच महिलांना घेता यावा, यासाठी सरकारने वेळोवेळी अर्जाच्या अटी आणि अर्जाची मुदत वाढवली आहे. लाडकी बहीण योजनेत याआधी 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र कागदपत्राची जुळवाजुळव आणि सरकारी कार्यालयातील महिलांची गर्दी पाहता सरकारने योजनेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती. पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आज 31 ऑगस्ट असल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
हे ही वाचा : Mumbai Crime : ड्रायव्हरला कानशिलात लगावली, उचलून जमिनीवर आपटलं; घाटकोपर घटनेचा थरारक Video समोर
अर्जाची अंतिम तारीख काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे वाचलं का?
अर्ज पडताळणीला सुरुवात
तसेच 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सूरू आहे. जिल्हास्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँककडे पाठवली जाणार आहेत.ही सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सूरू असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी एक्सवर दिली होती.
हे ही वाचा : Badlapur: 'तो एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखा...', अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीनं सांगितलं भीषण सत्य
त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्धपातळीवर सूरू झाली आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत. या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का? याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
ADVERTISEMENT
'या' तारखेला पैसे खात्यात येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT