Ladki Bahin Yojana: 'या' महिलांनी मारला सरकारी तिजोरीवर डल्ला! सरकारला किती कोटींचा बसला फटका?

मुंबई तक

ladki Bahin Yojana Latest News: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली.

ADVERTISEMENT

या लाडक्या बहिणींनी हातातले 7500 गमावले
या लाडक्या बहिणींनी हातातले 7500 गमावले
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली समोर

point

5 लाख अपात्र महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

point

सरकारच्या तिजोरीवर बसला कोट्यावधी रुपयांचा फटका

ladki Bahin Yojana Latest News: राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. सरकार या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य करत आहे. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. अपात्र महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाल्याने सरकारी तिजोरीला मात्र कोट्यावधी रुपयांचा फटका बसल्याचं समोर आलंय. 

महायुती सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सात हफ्त्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला. परंतु, महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यावर या योजनेत गैरव्यवहार झाल्याचं आणि काही अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं छाननीच्या माध्यमातून समोर आलं. 5 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या महिलांना मिळालेले पैसे परत द्यावे लागतील, अशा चर्चा सुरु होत्या.

हे ही वाचा >> Sambhajinagar : शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की, हॉटेल चालकाला मारहाण

परंतु, महिलांकडून पैसै परत घेतले जाणार नाहीत, असं सरकारने नुकतचं स्पष्ट केलंय. पण दुसरीकडे सरकारी तिजोरीला कोट्यावधी रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांवर झालेला खर्च समोर आला आहे. ही रक्कम कोट्यावधी रुपयांमध्ये असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. डिसेंबर 2024 मध्ये अपात्र महिलांची संख्या 2.46 कोटी होती. परंतु, सरकारने पुन्हा छाननी केल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी कमी झालीय. त्यामुळे सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांची संख्या 2.41 कोटींवर पोहोचली आहे. रिपोर्टनुसार, अपात्र महिलांनी सहा हफ्त्यांच्या रक्कमेचा लाभ घेतल्याने सरकारला जवळपास 450 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे महिलांना मिळालेले पैस परत घेतले जाणार नाहीत, असं सरकारने जाहीर केल्याने सरकारचं आर्थिक नुकसान झालं आहे.

हे ही वाचा >> 11 February 2025 Gold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी! मुंबईसह 'या' शहरांत सोन्या-चांदीचे दर भिडले गगनाला, वाचा आजचे भाव

हे वाचलं का?