11 February 2025 Gold Rate : सोन्याला पुन्हा झळाळी! मुंबईसह 'या' शहरांत सोन्या-चांदीचे दर भिडले गगनाला, वाचा आजचे भाव
Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी 11 फेब्रुवारी 2025 ला सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आजचे सोन्या-चांदीचे दर वाचून थक्कच व्हाल
सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचे भाव काय?
Today Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी 11 फेब्रुवारी 2025 ला सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सोनं 87 हजारांपार गेलं आहे. तर चांदीचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय.
आज मंगळवारी 11 फेब्रुवारी 2025 ला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87220 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 79960 रुपयांवर पोहोचले आहेत. तसच चांदी आज प्रति किलोग्रॅम 99400 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87220 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79960 रुपये झाली आहे.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87070 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79810 रुपये झाली आहे.









