Mazi Ladki Bahin Yojana: ...नाहीतर 1500 रुपये मिळणार नाही, तुमच्या अर्जाचं नेमकं Status काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 तुमच्या अर्जाचं  नेमकं Status काय?
तुमच्या अर्जाचं नेमकं Status काय?
social share
google news

Mazi Ladki Bahin Yojana status: मुंबई: माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना आता त्यांच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे पाहता येणार आहे. सरकारकडून याबाबतची यादी जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे जाणून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला 1500 रुपये मिळण्याची शक्यता कमी होऊ शकतो. (mazi ladki bahin yojana what is exact status of your application know exactly how many types of application otherwise you will not get 1500 rupees)

App वर तपासा तुमच्या अर्जाचं स्टेट्स

  • लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला ॲप ओपन करावे लागेल आणि लॉगिन तपशील टाकून लॉगिन करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा अर्जदार महिलेचे नाव टाकावे लागेल आणि गेट स्टेट्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या समोर स्टेट्स उघडेल ज्यामध्ये तुम्हाला Approval, Pending, Reject असे तीन पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेट्स पाहू शकता.

वेबसाइटवरून देखील तपासता येईल तुमच्या अर्जाची स्थिती

  • महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे आणि त्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे, तर त्या खालील प्रक्रियेचा अवलंब करून तपासू शकतात.
  • सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
  • होम पेजवर तुम्हाला अर्जदार लॉगिनची लिंक दिसेल, तुम्हाला या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर लॉगिन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • लॉगिन केल्यानंतर, तुमच्या समोर डॅशबोर्ड उघडेल ज्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना अर्जाच्या स्टेट्सची लिंक दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव टाकावे लागेल आणि Get Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमच्यासमोर स्टेटस उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पेंडिंग, अप्रूव्हल, रिजेक्ट या तीन पर्यायांपैकी एक पर्याय दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता.
  • अशा प्रकारे, तुम्ही लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन सादर केलेल्या लाडकी बहिन योजनेची प्रलंबित स्थिती तपासू शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.

स्टेट्सचे प्रकार

प्रलंबित स्थिती (Pending Status)- जर तुमची अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित म्हणून दर्शवत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.

रिजेक्ट स्टेटस (Reject Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Reject दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज सरकारने रद्द केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुनरावलोकन स्थिती (Review Status) - जर तुमच्या अर्जाची स्थिती Review म्हणून असेल, तर याचा अर्थ असा आहे की, सरकार तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करत आहे.

मंजुरीची स्थिती (Approval Status) - जर तुम्ही तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती Approval असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला आहे. 

ADVERTISEMENT

प्रलंबित अर्जाचे निराकरण कसे करावे?

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील महिलांनी अर्ज केले असून त्यापैकी काही महिलांचे अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. यानंतर त्या महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की, त्यांचे स्टेट्स का प्रलंबित आहे? पण जरी तुमचे स्टेट्स पेंडिंग दिसत असेल तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमचा अर्ज सरकारकडून तपासला जात आहे. सत्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा देखील अर्ज मंजूर केला जाईल.

ADVERTISEMENT

संपर्क कुठे साधावा?

महिला व बाल विकास विभाग
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मॅडम काम रोड
हुतात्मा राजगुरू चौक मुंबई महाराष्ट्र भारत – ४००३२


माझ्या अर्जाची स्थिती प्रलंबित दर्शवत आहे, मी काय करावे?

  • जर तुमच्या अर्जाची स्थिती प्रलंबित दर्शवत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण हा सरकारी प्रक्रियेचा एक भाग आहे.

अर्जात चुका असल्यास काय करावे?

  • तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास, ते दुरुस्त करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा आणि अर्ज पुन्हा सबमिट करा. जर काही त्रुटी नसेल तर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज प्रलंबित का दिसत आहे?

  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही पूर्णपणे योग्य पद्धतीने भरला असेल आणि तरीही तो प्रलंबित असेल तर काहीही काळजी करण्याची गरज नाही. कारण सध्या तुमचा अर्ज हा शासकीय प्रक्रियेत असून त्यावर शासनाची कार्यवाही सुरू आहे. अर्ज तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अर्ज प्रलंबित असल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे धीर धरा अजिबात घाई करू नका.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT