Mumbai: आधुनिक 5G Ambulance सेवा सुरू, नेमकं काय आहे या रुग्णवाहिकेत?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

modern 5G ambulance service launched in mumbai how exactly is this ambulance
modern 5G ambulance service launched in mumbai how exactly is this ambulance
social share
google news

Mumbai 5G Ambulance: मुंबई: ख्यातनाम हेल्थकेअर कंपनी झेन्झोने आपली पहिली वहिली आणि अनोखी 5G रुग्णवाहिका सेवा मुंबईमध्ये सुरु केली आहे. ज्यामध्ये अत्यंत वेगवान अशा 5G तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना सेवा दिली जाईल. 5G रुग्णवाहिका सेवेमुळे आपत्कालीन स्थितीत गंभीर अवस्थेत रुग्णाचे केले जाणारे निदान आणि उपचार पद्धती कायमची बदलणार आहे. (modern 5G ambulance service launched in mumbai how exactly is this ambulance)

ADVERTISEMENT

झेन्झोची आधुनिक 5G रुग्णवाहिका ही अत्यंत प्रगत अशा उपकरणांनी सज्ज असून त्यात उच्च दर्जाची कम्युनिकेशन क्षमता आहे. ज्यामुळे आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यतेचा वेग आणि अचूकता सुधारणार आहे. ज्याचा थेट फायदा रुग्णाला होणार असून गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णसेवा करण्याची एकूण कार्यक्षमता देखील वाढणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, “झेन्झोने हाती घेतलेल्या या अभिनव उपक्रमामुळे खूप आनंद झाला असून मुंबईत ही अत्यंत आधुनिक असणारी 5G ने सुसज्ज अशी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या त्यांच्या ह्या उपक्रमाचे मी स्वागत करतो. मला खात्री आहे की यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होईल.”

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Birth Tourism : महिला परदेशात जाऊन मुलांना का देतायत जन्म?

झेन्झो रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याची घोषणा करताना, झेन्झोचे संस्थापक शफी माथेर म्हणाले, “ही अत्याधुनिक आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरू करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. अत्यंत प्रगत अशा 5G तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा रुग्णवाहिका निर्मिती खरंच क्रांतिकारी आहे. याद्वारे त्याच क्षणी बसल्या जागी हेल्थ डेटा मिळवता येईल आणि शेअर करता येईल.

ADVERTISEMENT

रुग्णाची अजून उत्तम पद्धतीने देखभाल करणे सोप्पे होईल आणि उपचार अधिक जलद गतीने होतील. व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, मल्टीपॅरा पेशंट मॉनिटर्स, ईसीजी मशीन आणि सिरिंज पंप यासारख्या जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख मशीन्स यात असल्याने, ह्या रुग्णवाहिकेद्वारे सर्वसमावेशक आणि आयुष्य वाचवणारी आपत्कालीन सेवा देणे सुलभ होते.

ADVERTISEMENT

झेन्झोच्या डायरेक्टर श्वेता मंगल म्हणाल्या, “ही इमर्जन्सी प्री-हॉस्पिटल आरोग्य सेवा सुरु करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या युजर्ससाठी ही सेवा जलद आणि सहज मिळावी म्हणून आमचे झेन्झो अॅप सुद्धा तयार आहे, ज्याद्वारे अगदी काही सेकंदात सेवा बुक केली जाऊ शकते. झेन्झोला ‘वन स्टॉप मेडिकल कॉन्सर्ज’ बनवण्याचे आमचे ध्येय आहे. जेणेकरून कंपन्यांना एकाच छताखाली सर्व सेवा मिळतील जसे की, साईटवर रुग्णवाहिका असणे, कामाचे ठिकाण निरोगी असणे, कर्मचाऱ्यांसाठी टेली-हेल्थ सर्विस, मेडिकल रूम्स, साईटवर डॉक्टर उपलब्ध असणे, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि व्यावसायिक आरोग्य केंद्रे आणि बरंच काही.”

आधुनिक 5G रुग्णवाहिका सेवेची वैशिष्ट्ये

रुग्णांच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवणे : अत्यंत प्रगत अशी मॉनिटरिंग सिस्टम रुग्णाच्या शरीरातील प्रमुख लक्षणे त्याच क्षणी दर्शवते, ज्यामुळे त्वरित उपचार करून गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचवता येतो.

वैद्यकीय तज्ज्ञांसह थेट संपर्क: रुग्णवाहिकेमधून थेट व्हिडियो-कॉन्फरन्सिंगद्वारे वैद्यकीय तज्ज्ञांसह संपर्क साधता येतो आणि ते त्याच क्षणी योग्य सल्ला देतात आणि जलद निर्णय घेतात.

हे ही वाचा >> तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटतंय? पण तो आजार नाही; तर…

विविध जाणकारांची मते:विविध वैद्यकीय जाणकारांकडून विविध गोष्टींवर मते मागवली जातात आणि ज्याचा फायदा रुग्णाला मिळून त्याला सर्वसमावेशक उपचार मिळतात.

रुग्णवाहिकेमध्ये असतानाच उपचार सुरु: रुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलकडे जातानाच उपचार सुरु होतात, ज्यामुळे वेळीच रुग्णाला मदत मिळून त्याच्यावरचा धोका टळू शकतो.

रुग्णाचा गोल्डन आव्हर वाढवणे: गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाचा ‘गोल्डन आव्हर’ अर्थात त्याला जिवंत ठेवण्याचा कालावधी वाढवून 5G रुग्णवाहिका त्याच क्षणी आवश्यक उपचार प्रदान करते आणि रुगाचा जीव बचावते.

प्री-अरायव्हल इमर्जन्सी रूम सपोर्ट : हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच हॉस्पिटलला कळवून आगाऊ वैद्यकीय तयारी केली जाते जेणेकरून रुग्णाचा वेळ वाया जात नाही आणि त्याला वेळावर उपचार मिळतात.

झेन्झोच्या इतर रुग्णवाहिका सेवा

झेन्झोद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या अन्य रुग्णवाहिका सेवांमध्ये रुग्णवाहिका सबस्क्रिप्शन, ऑन-साइट रुग्णवाहिका, इव्हेंट रुग्णवाहिका, एयर रुग्णवाहिका, मेडिकल रूम्स, कॉर्पोरेट वेलनेस प्रोग्राम आणि मोबाइल मेडिकल व्हॅन यांचा समावेश आहे.

झेन्झोचे मुख्य उद्दिष्ट आहे आधुनिक आरोग्यसेवेसह आयुष्य सुधारणे ज्यामुळे निरोगी जीवनाला चालना मिळेल. ज्यामध्ये कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याआधीची सेवा आणि आरोग्यदायी सेवांचाही समावेश आहे. झेन्झो कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर, हॉस्पीटॅलिटी, मॅन्यूफॅक्चरिंग, लॉजीस्टिक, एज्युकेशन, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, आयटी आणि अजून बऱ्याच क्षेत्रांसाठी मागणीनुसार आणि गरजेनुसार विशेष हेल्थकेअर सेवा निर्माण करण्यात तज्ज्ञ आहे. ग्राहकांची विशेष गरज पूर्ण करण्यासाठी झेन्झो ग्राहकांचे आरोग्य आणि सुलभता यांना प्राधान्य देऊन विशेष सेवा निर्माण करते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT