Aadhar Card हरवलंय? काळजी कसली करताय? घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा नवीन!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवीन आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवता येणार?

point

'आधार कार्ड' ऑनलाइन डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय?

point

UIDAI आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याचीही सुविधा प्रदान करते.

How to get Aadhar card Online : आधार कार्ड आज प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. सिम कार्ड मिळण्यापासून ते बँक खाते उघडण्यापर्यंत आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी 'आधार कार्ड' आवश्यक आहे. याशिवाय, जर तुम्हाला गॅस सबसिडी मिळवायची असेल किंवा PM आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला यासाठी देखील आधार कार्ड आवश्यक आहे. (UIDAI how to get aadhar card online know the all process of it)

ADVERTISEMENT

अनेकदा आधार कार्ड हरवल्यावर किंवा फाटल्यावर लोकांना काळजी वाटते. कारण, एकदा जर ते पुन्हा मिळवायचं म्हटलं की ती लांबलचक प्रक्रिया नको वाटते. अनेकांना यासाठी आधार सेवा केंद्रात जाणं टाळायचं असतं. पण आता यासाठी कुठलीच काळजी करण्याची गरज नाही कारण आधार कार्ड घरी बसल्या सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. 

हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana Documents : 'ही' चार कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!

नवीन आधार कार्ड घरबसल्या कसं मिळवता येणार?

आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. हे आधार कार्डधारकांना 'कार्ड' ऑनलाइन डाउनलोड करण्याचीही सुविधा प्रदान करते. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather forecast : चार जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, IMD चा आजचा अंदाज काय?

'आधार कार्ड' ऑनलाइन डाउनलोड करण्याची प्रक्रिया काय?

  • तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरमध्ये https://uidai.gov.in/ उघडा.
  • आता तुम्हाला डाव्या बाजूला 'My Aadhaar' चा पर्याय मिळेल.
  • यावर कर्सर नेल्यानंतर ड्रॉप डाउन सूची येईल. येथे 'Get Aadhaar' विभागात 'Download Aadhaar' वर क्लिक करा.
  • यानंतर वेबसाइट तुम्हाला एका नवीन पेजवर घेऊन जाईल, त्यासाठी पॉप अप होणाऱ्या ओके वर क्लिक करा.
  • आता दिसणाऱ्या पेजवर 'आधार डाउनलोड करा' वर क्लिक करा.
  • यानंतर, आधार क्रमांक किंवा नावनोंदणी आयडी किंवा VID मधून कोणताही एक पर्याय निवडा.
  • आता आधार क्रमांक नंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि नंतर 'ओटीपी सेंड' वर क्लिक करा.
  • OTP मिळल्यानंतर, तो तिथे प्रविष्ट करा... आता तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येईल. 

हेही वाचा : पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल सेवा सुरु आहे का? अपडेट काय?

UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केलेले E-Aadhaar देखील फिजिकल आधार कार्डप्रमाणे वैध आहे. तुम्ही ते कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही PVC कार्डसाठी UIDAI वेबसाइटवरून देखील अर्ज करू शकता आणि त्याच पेजवरून तुमच्या अर्जाची स्थिती देखील ट्रॅक करू शकता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT