इंदिरा गांधींनी मंदिरात जाणं टाळलं अन् संजय गांधींचा विमान अपघात; त्यादिवशी नेमकं काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Gandhi Death : 23 जून 1980 पिट्स एस2-ए नावाचे छोटे विमान. संजय गांधी हे विमान चालवत होते. पण विमान वळवत असताना ते कोसळले. या अपघातात संजय गांधींचा मृत्यू झाला. याच्या एक दिवस आधी म्हणजे 22 जूनला इंदिरा गांधी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील चामुंडा देवी मंदिरात दर्शनासाठी जाणार होत्या. संजय गांधींसोबत जाण्याची योजना होती. पण इंदिरा-संजय गांधींची चामुंडा देवी यात्रा 20 जूनलाच रद्द झाली. हे ऐकून मंदिराच्या पुजाऱ्याने संतप्त प्रतिक्रिया दिली. पुजारी म्हणाला की, ‘कोणताही शासक देवीचा अपमान करू शकत नाही. अन्यथा देवी त्यांना माफ करणार नाही.’ (What is the exact connection between Sanjay Gandhi’s plane crash and Indira Gandhi’s Chamuda Devi Darshan)

ADVERTISEMENT

संजय गांधी यांचा मृत्यू, त्यापूर्वी चामुंडा देवी मंदिराची यात्रा रद्द, ही यात्रा कोणी रद्द केली? यानंतर इंदिराजी चामुंडा देवीच्या दर्शनासाठी कधी पोहोचल्या? याबाबत नीरजा चौधरी यांनी त्यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड’ या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे.

Mumbai train firing : बुरखाधारी महिलेला म्हणायला लावलं ‘जय माता दी’, CCTV त कैद

इंदिराजींना चामुंडा देवी दर्शनाचा सल्ला

जानेवारी 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, विजयानंतर इंदिराजींचे जवळचे मित्र अनिल बली यांनी त्यांना एक सल्ला दिला होता. बली म्हणाले की, ‘शपथ घेतल्यानंतर चामुंडा देवीच्या दर्शनाला जावे. 15 जून रोजी इंदिराजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर इंदिरा गांधी राष्ट्रपती भवनातून थेट 12, विलिंग्डन क्रिसेंट येथे त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. जिथे त्यांना कीर्तनात सहभागी व्हायचे होते.

हे वाचलं का?

कीर्तनावेळी अनिल बली यांनी पुन्हा एकदा इंदिराजींना चामुंडा देवीचे दर्शन घेण्याची आठवण करून दिली. ज्याला इंदिराजी म्हणाल्या, ‘मला चार ते पाच महिन्यांचा वेळ द्या.’ चार महिने उलटले. मे 1980 च्या पहिल्या आठवड्यात बली यांना आरके धवन यांचे पत्र आले. धवन हे इंदिराजींचे जवळचे सचिव आणि सहकारी होते. 22 जून 1980 रोजी इंदिराजींना चामुंडा देवी मंदिरात जायचे होते, असे या पत्रात म्हटले होते. 22 जून रोजी संध्याकाळी 4.45 वाजता इंदिरा तिथे पोहोचतील, असे धवन यांनी पत्रात लिहिले होते.

धवन यांच्या या पत्रानंतर बली चामुंडा देवीला पोहोचले. तिथे पूजा व इतर कार्यक्रमांची व्यवस्था सुरू केली. मंदिरातील स्थानिक लोक आणि उपासकांसाठी हवन आणि लंगरचे आयोजन करण्यात येणार होते. बली यांच्यासोबत हिमाचल प्रदेशातील राम लाल सरकारचे जवळपास सर्व मंत्री मंदिरातील व्यवस्थेत गुंतले होते. इंदिराजींच्या भेटीच्या दोन दिवस आधी (20 जून रोजी) एक मेसेज पोहोचला. पंतप्रधानांचा कार्यक्रम रद्द झाल्याचा हा मेसेज होता. पुस्तकानुसार, हे ऐकून मंदिराच्या पुजाऱ्याने अतिशय तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

Gadar 2 : पठाण, बाहुबलीला पछाडलं! गदर 2 ची रेकॉर्ड ब्रेक कमाई,किती कोटी कमावले?

पुजारी म्हणाला, “तुम्ही इंदिराजींना सांगा की ही चामुंडा आहे. जर कोणी सामान्य व्यक्ती येऊ शकला नाही तर देवी क्षमा करेल. पण राज्यकर्त्याने अपमान केला तर देवी माफ करणार नाही. देवीचा अनादर करू शकत नाही.” 22 जून रोजी इंदिरा गांधी चामुंडा देवी मंदिरात पोहोचल्या नाहीत, परंतु वेळापत्रकानुसार कीर्तन आणि पूजा पाठ आयोजित करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

संजय गांधींचं विमान कोसळलं!

23 जून रोजी सकाळी अनिल बली चामुंडापासून 50 किलोमीटर दूर असलेल्या ज्वालामुखी मंदिरात पोहोचले. तेवढ्यात त्यांचा सचिव त्याच्याकडे धावत आला. सचिवांनी सांगितले की, पाकिस्तान रेडिओ संजय गांधींच्या विमान अपघाताच्या बातम्या चालवत आहे. ज्या खऱ्या होत्या. स्टंट करताना संजय गांधींचे विमान कोसळले आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संजय गांधींच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता.

संजय गांधींच्या मृत्यूची बातमी कळताच बली लगेच दिल्लीला रवाना झाले. त्यांनी थेट इंदिराजींचे निवासस्थान गाठले. इंदिरा संजय गांधींच्या मृतदेहाजवळ बसल्या होत्या. बाली यांना पाहताच इंदिराजींनी त्यांना विचारले, “मी चामुंडाला जाणं रद्द करणं याचा यासर्वाशी काही संबंध आहे का?”

इंदिराजींचे हे शब्द ऐकून बली यांनी आधी त्यांना शांत केले आणि म्हणाले, “मी तुमच्याशी नंतर बोलेन.”

इंदिराजींनाही माहीत नव्हते की कार्यक्रम कोणी रद्द केला?

संजय गांधींच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी बली 1, अकबर रोडला पोहोचले. इंदिरा गांधी अभिनेते सुनील दत्त आणि त्यांची पत्नी नर्गिस यांच्यासोबत उभ्या होत्या. इंदिराजींनी बली यांना पाहताच त्यांच्याशी बोलायला आल्या. बली यांनी सांगितले की, ज्या दिवशी इंदिराजी चामुंडा येथे जाणार होत्या त्या दिवशी काय झाले?

पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, इंदिराजी बली यांना म्हणाल्या की, त्यांचा कार्यक्रम कोणी रद्द केला हे त्यांनाही माहित नाही. इंदिरा आणि संजय गांधींना जम्मूहून चामुंडा गाठायचे होते. बली यांच्या म्हणण्यानुसार, इंदिराजींना सांगण्यात आले की चामुंडा येथील हवामान खराब आहे आणि तेथे मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या काही तासांत हेलिकॉप्टर तेथे उतरू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी एक दिवस आधीच दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट बली यांच्या घशातून बाहेर पडली नाही. त्यांनी इंदिराजींना सांगितले की, चामुंडा येथे हवामान खराब नव्हते आणि पाऊसही पडत नव्हता. कोणीतरी इंदिराजींच्या वतीने चामुंडा येथे न जाण्याचा निर्णय घेतला होता.

Nawab Malik : ना अजित पवार, ना शरद पवार… मलिकांचा नेमका ‘गेम’ काय?

नंतर इंदिराजींनी पुपुल जयकरला सांगितले की, संजय गांधींचा मृत्यू ही त्यांची चूक आहे. त्यांना मंदिरात जी पूजा करायची होती ती केली नाही. संजय यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी इंदिराजींचे राजकीय सहकारी एमएल फोतेदार यांनी बली यांना फोन केला. फोतेदार म्हणाले, “पंतप्रधानांना तुम्हाला भेटायचे आहे. सकाळी साडेसातला पोहोचले पाहिजे.”

यानंतर 13 डिसेंबर 1980 रोजी इंदिरा गांधी चामुंडा देवी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. इंदिराजी पूजा करत असताना मंदिराच्या पुजाऱ्याचे हात थरथरत होते. इंदिराजी ज्या प्रकारे पूर्णाहुतीसाठी मंत्र पठण करत होत्या, गर्भगृहात ज्या प्रकारे नतमस्तक झाल्या होत्या किंवा कालीची पूजा करण्यासाठी मुद्रा करत होत्या, तेव्हा त्यांनी हे सर्व अत्यंत सिद्धतेने केले होते. चामुंडा देवी मंदिरात दर्शनावेळी इंदिरा गांधी फक्त रडत होत्या. असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.

दर्शनानंतर इंदिराजींनी संजय गांधींच्या नावाने चामुंडा येथे एक घाट बांधला जावा असं म्हटलं होतं. त्यावेळी काँग्रेस नेते सुखराम यांनी हा घाट 80 लाखांत बांधला. नंतर त्यांना केंद्रीय संचार मंत्रीही करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT