गाडीचे ‘Brake-Fail’ का होतात? तुम्ही गाडी चालवत असताना असं झालं तर काय कराल?

रोहिणी ठोंबरे

सध्या रस्ते अपघाताची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अशावेळी प्रवास करायलाही भीती वाटते. जेव्हा ‘ब्रेक-फेल’ हा शब्द ऐकतो तेव्हा मनात आपसुकच धडकी भरते. काही प्रकरणांमध्ये लोकांच्या जीवालाही धोका निर्माण असतो. पण रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा ब्रेक का फेल होतो? याची कारणे कोणती?

ADVERTISEMENT

What is the main cause of brake failure? How do you prevent brake failure?
What is the main cause of brake failure? How do you prevent brake failure?
social share
google news

What You Do If Your Car Break’s Get Fail : सध्या रस्ते अपघाताची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसत आहेत. अशावेळी प्रवास करायलाही भीती वाटते. जेव्हा ‘ब्रेक-फेल’ हा शब्द ऐकतो तेव्हा मनात आपसुकच धडकी भरते. काही प्रकरणांमध्ये लोकांच्या जीवालाही धोका निर्माण असतो. पण रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा ब्रेक का फेल होतो? याची कारणे कोणती? याविषयी आपण सविस्तर समजून घेऊयात. (Why does car Brake Fail happen in This Situation What you do)

ब्रेक फेल होण्याची लक्षणं कोणती?

आपत्कालीन परिस्थितीत वॉर्निंग लाइट्सचा वापर केला जातो. गाडी चालवताना ब्रेकची समस्या किंवा तांत्रिक बिघाड असल्यास, इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये ब्रेक वॉर्निंग लाइट्स लागलेली दिसेल. पण याचा अर्थ असा नाही की जेव्हा लागते तेव्हा कारचा ब्रेक फेलच झाला असेल, याचा अर्थ कारच्या ब्रेकिंग सिस्टमला दुरुस्तीची आवश्यकता आहे असाही असू शकतो. याशिवाय, अशी काही लक्षणं आहेत ज्याद्वारे तुम्ही अंदाज लावू शकता की कारच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये काही समस्या आहे.

NCP Crisis : अजित पवारांना मिळणार घड्याळ चिन्ह? शरद पवार तसे का बोलले?

  • जेव्हा तुम्ही पेडल खाली ढकलता तेव्हा ग्राइंडिंग आवाज येतो जे खराब ब्रेक डिस्कचे लक्षण आहे.
  • गाडी थांबवण्यासाठी ब्रेक पेडलवर जास्त दाब द्यावा लागतो.
  • जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा तुमचे वाहन एका बाजूला वळते.
  • गाडी चालवताना जळालेला वास येतो.
  • गाडी चालवताना ब्रेक फ्लुइड लीक होणे.
  • ब्रेक फेल होण्याची ‘ही’ आहेत मुख्य कारणे!

ब्रेक फ्लुइड लीकेज : कारचे ब्रेक फेल होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ब्रेक फ्लुइड लीक होणे. जेव्हा ड्रायव्हर ब्रेक पेडल दाबतो, तेव्हा ब्रेक फ्लुइड त्या फोर्सला ब्रेक डिस्कपर्यंत ट्रान्सफर करतो, ज्यामुळे कारचे चाक मंद होते किंवा थांबते. जर ते ब्रेक फ्लुइड लीक करत असेल, तर ही पद्धत योग्यरित्या काम करत नाही आणि ड्रायव्हरने लावलेला पूर्ण जोर ब्रेकपर्यंत पोहोचत नाही म्हणूनच लिकेज दिसताच कार दुरुस्त करा.

ब्रेक सिलेंडर : ब्रेक फेल होण्याचे आणखी एक कारण म्हणजे खराब ब्रेक सिलेंडर. ब्रेक सिलिंडर हा कारच्या ब्रेकिंग सिस्टीमचा भाग आहे जिथे ब्रेक फ्लुइड कंप्रेस केले जाते, जर सिलिंडर खराब झाला तर सिस्टमची शक्ती कमी होते आणि ब्रेक योग्यरित्या कार्य करणार नाहीत.

हे वाचलं का?

    follow whatsapp