PCOD म्हणजे काय? तो का होतो आणि त्यावर उपाय काय? समजून घ्या सगळं…

रोहिणी ठोंबरे

आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे.

ADVERTISEMENT

causes-of-pcod-and-remedies
causes-of-pcod-and-remedies
social share
google news

Women Health : महिलांचं वय वाढत जातं तसंच त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात. यासोबत, समस्या उद्भवू लागतात. धकाधकीच्या या जीवनात महिलांच्या आरोग्याबाबत दिवसेंदिवस अनेक वाढत आहेत. यातच जाणवणारी एक समस्या म्हणजेच हार्मोनल प्रॅाल्बम. ज्याचा महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम होतो. आज देशातील 10 पैकी 8 महिला तरी मासिक पाळी किंवा ‘PCOD’ने त्रस्त आहेत. (Women Health Problem Causes of PCOD and remedies on it)

तुमच्या आजूबाजूला, मित्र मैत्रिणींमध्ये, घरात तुम्ही PCOD या शब्दाबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हा शब्द तुमच्या कानावर पडला असेलच. पण सर्वानाच याबद्दलची माहिती नाहीये. त्यामुळे आज आपण पीसीओडीची कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेणार आहोत.

वाचा : नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देताना काळाने साधला डाव! दोघांचा मृत्यू, तर दोघांचा…

PCOD म्हणजे काय?

PCOD ही महिलांमधील एक सामान्य समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण हार्मोनलमधील असंतुलन आहे. लठ्ठपणा, अल्कोहोल आणि सिगारेटचे सेवन, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन, आरोग्याशी संबंधित समस्यांनी ग्रस्त अशा अनेक कारणांमुळे हार्मोन्समध्ये असंतुलन होते.

PCOD मुळे, स्त्रीला अनियमित मासिक पाळी, मासिक पाळी न येणे, चेहऱ्यावरचे केस आणि पुरळ, ओटीपोटात वेदना होतात. काही प्रकरणांमध्ये तर, महिलांना गर्भधारणेवेळी अडचणी किंवा वंध्यत्वा सारख्या गंभीर समस्याही उद्भवतात. या आणि अशा अनेक समस्या PCOD मुळे निर्माण होणाच्या शक्यता आहेत. सुरुवातीच्या काळात ही समस्या 30-35 च्या स्त्रियांना जाणवत होती. मात्र, आता PCOD चा त्रास 18 ते 30 वर्षांच्या मुलींनादेखील होतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp