Nobel Prize च्या जन्माची गोष्ट, कशी झाली सुरूवात; कोण होते अल्फ्रेड नोबेल?
अल्फ्रेड नोबेल यांच्याकडून या पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झाली. 1901 मध्ये थोर कवी आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांना आशिया व भारत मधील पहिला नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील ‘गीतांजली’ या काव्यग्रंथाबद्दल हे नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
ADVERTISEMENT

Alfred Nobel and History of Nobel Prize : 2023 साठी नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा सुरू झाली आहे. वैद्यकशास्त्र आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. हंगेरीच्या कॅटलिन कारिको आणि अमेरिकेच्या ड्रू वाइजमॅन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळाले. दोघेही पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात एकत्र काम करतात. मेसेंजर RNA (mRNA) तंत्रज्ञानाच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळेल. कोरोना लस तयार करण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. भौतिकशास्त्रात तीन शास्त्रज्ञांना पुरस्कार मिळाले आहेत. पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉस आणि अॅन लेहुलियर. (Who is Alfred Nobel Know the History of Nobel Prize Starting)
नोबेल पारितोषिक 06 कॅटेगरींमध्ये दिले जाते. रसायनशास्त्र, पीस, अर्थशास्त्र आणि साहित्यातील विजेत्यांची घोषणा येत्या काही दिवसांत केली जाईल.
Hemant Patil : शिंदेंच्या खासदाराला स्टंटबाजी भोवली! पोलिसांनी दाखल केला अॅट्रॉसिटीचा गुन्हा
नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. त्याची स्वतःची ओळख आहे. तो प्रामाणिकपणा आणि मानवतेचा निकष मानला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्याकडून या पुरस्काराची सुरुवात 1901 मध्ये झाली. त्यांचा जन्म स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे झाला. जेव्हा ते 4 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब रशियाला स्थायिक झाले. त्यांचे वडील गनपावडरचा कारखाना चालवायचे. रशियाचा राजा देखील खरेदीदारांमध्ये होता. नंतर गनपावडरचा वापर कमी झाला. यामुळे अल्फ्रेडच्या वडिलांना कारखाना बंद करावा लागला. ते स्वीडनला परत आले.
पण अल्फ्रेड यांनी गनपावडर बनवणं सोडलं नव्हतं. त्यांनी रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मग ते स्वस्त आणि सुरक्षित प्रकारची स्फोटके बनवू लागले. संशोधनादरम्यान प्रयोगशाळेत एक अपघातही झाला. यामध्ये त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. मात्र, नंतर डायनामाइट बनवण्यात त्यांना यश आले. डायनामाइटनंतर, अल्फ्रेड यांनी 1875 मध्ये जिलेटिनचा शोध लावला. त्यानंतर त्यांचा व्यवसाय वाढत गेला. त्यांनी युरोपमधील स्वीडन, जर्मनी, स्कॉटलंड, फ्रान्स आणि इटलीमध्ये 90 हून अधिक कारखाने उभारले. स्वीडनच्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होते.