Mumbai North West Lok sabha 2024: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक निकाल
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा निवडणूक निकाल
social share
google news

Lok sabha Election 2024 Mumbai North West: उत्तर-पश्चिम मुंबई: उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या (Mumbai North West Lok Sabha Constituency) निवडणुकीचे सगळे अपडेट आणि बातम्या आपल्याला इथे पाहता येईल. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादीही आपल्याला पाहायला मिळेल. 2024 च्या निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. (mumbai north west lok sabha election results 2024)

LIVE UPDATE:

    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एकूण 54.84% मतदान झालं.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 53.67% मतदान झालं आहे.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 49.79% मतदान झालं आहे.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.91% मतदान झालं आहे.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.41% मतदान झालं आहे.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.53% मतदान झालं आहे.
    • मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.87% मतदान पार पडले.
    • महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं. 
    • लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात आलं. 

    लोकसभा निवडणूक 2024: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवार

    1. शिवसेना (ठाकरे गट) - अमोल किर्तीकर

    2. शिवसेना (शिंदे गट) - रविंद्र वायकर

    3. वंचित - परमेश्वर रणशूर

    उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

    1. वर्ष- 2019: गजानन किर्तीकर (विजयी उमेदवार- शिवसेना) 56.61% मतं

    2. वर्ष- 2014: गजानन किर्तीकर (विजयी उमेदवार- शिवसेना) 60.95% मतं

    3. वर्ष- 2009: गुरुदास कामत (विजयी उमेदवार- काँग्रेस) 31.97% मतं

    4. वर्ष- 2004:  सुनील दत्त (विजयी उमेदवार- काँग्रेस) 53.03% मतं

    5. वर्ष- 1999:  सुनील दत्त (विजयी उमेदवार- काँग्रेस) 43.08% मतं

    लोकसभा 2024 निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. https://www.mumbaitak.in/lok-sabha-2024-election/ वर रिअल टाइममध्ये लोकसभा निवडणुका 2024 बाबत माहिती पाहता येईल. यामध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा तपशील तसेच लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या अपडेट आपल्याला पाहता येईल. ताज्या बातम्या आणि विश्लेषणासाठी Twitter वर @mumbaitak ला फॉलो करा.

     

    महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची यादी

    हे वाचलं का?

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT