Ajit Pawar : "शरद पवार, फडणवीस, अदानी सगळेच बैठकीत होते...", भाजपसोबत जाण्याबद्दल खळबळजनक दावा
आठवडाभरावर निवडणुकांचं मतदान आलं असतानाही चर्चा मात्र अजूनही 2019 मध्ये घडलेल्या घडामोडींचीच सुरू आहे. याला कारण आहे अजित पवार नुकतंच केलेलं एक वक्तव्य.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गौतम अदानींचं नाव घेऊन काय म्हणाले अजित पवार?
भाजपसोबत जाण्याचा आदेश पवारांना दिला होता?
2019 ला काय घडलं होतं?
Ajit Pawar Vs Sharad Pawar : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची जरोदार तयारी सुरू आहे. अगदी आठवडाभरावर निवडणुकांचं मतदान आलं असतानाही चर्चा मात्र अजूनही 2019 मध्ये घडलेल्या घडामोडींचीच सुरू आहे. याला कारण आहे अजित पवार नुकतंच केलेलं एक वक्तव्य. अजित पवार यांनी 2019 ला मविआची बांधणी सुरू असताना घेतलेल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीमागे शरद पवारच होते हे सांगितलं आहे. तसंच या बैठकीला राजकीय मंडळींसह उद्योगपती गौतम अदानी हे सुद्धा उपस्थित होते असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray : अधिकाऱ्यांना काही कळतं की नाही? उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले?
अजित पवार यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत 2019 झालेल्या राष्ट्रावादी आणि भाजपमधील बैठकीचा पुनरोच्चार केला. अजित पवार म्हणाले, 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी कुठे बैठक झाली हे सर्वांना माहिती आहे… सर्वजण तिथे होते. मी पुन्हा सांगतो की त्या बैठकीला अमित शाह होते, गौतम अदानी होते, प्रफुल्ल पटेल होते, देवेंद्र फडणवीस शरद पवार होते. त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय शरद पवार यांना माहिती होता असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
हे वाचलं का?
अजित पवार पुढे बोलताना असं म्हणाले की, शरद पवार हे एक असे नेते आहेत, ज्यांच्या मनातलं कुणीच ओळखू शकत नाही, आमच्या काकी सुद्धा त्यांच्या मनातलं ओळखू शकत नाही. तसंच अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात आता विचारसरणी वगैरेबद्दल विचारू नका. महाराष्ट्राचं राजकारण बददलं आहे, आता सर्वांना आपली विचारसरणी बाजूला ठेवून सर्वांना आता सत्ता मिळवायची आहे. एकूणच अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादीकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Uddhav Thackeray Interview: "...म्हणून मी भाजपसोबत जाणार नाही"; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
अजित पवार यांनी केलेल्या या दाव्यांबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या, मी ऑन कॅमेरा सांगते, अशी कुठलीही बैठक झाली की नाही हे मला माहिती नाही.पहाटेच्या शपथविधीबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हतं. बैठक कुठे झाली, झाली की नाही हे अजित पवार यांना विचारा.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे यांच्या या उत्तरामुळे 2019 ला घडलेल्या घडामोडींमुळे अजूनही संभ्रम काय आहे. तरी शरद पवार आता यावर काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT