Devendra Fadnavis : मध्यप्रदेश, राजस्थानचा फॉर्म्युला महाराष्ट्रात का नाही चालला? फडणवीस पुन्हा येण्याची 10 कारणं
मध्यप्रदेशमधील विजयानंतर भाजपने विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या जागी ओबीसी चेहरा मोहन यादव यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याऐवजी चेहरा भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार!
भाजपने महाराष्ट्रात धक्कातंत्र का नाही वापरलं?
मागच्या पाच वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडीची टाईम लाईन
Devendra Fadnavis is New CM of Maharashtra : देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गटनेते म्हणून निवड झाली. यांच्या नावाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. आता 5 डिसेंबर म्हणजे उद्या संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी ते शपथ घेणार आहेत. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, धक्कातंत्रातून नवा चेहरा देण्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे. मात्र, भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान किंवा हरियाणाचाच फॉर्म्युला महाराष्ट्रात का राबवला नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. मध्यप्रदेशमधील विजयानंतर भाजपने विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या जागी ओबीसी चेहरा मोहन यादव यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. तर दुसरीकडे राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याऐवजी ब्राह्मण चेहरा भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. तसंच हरियाणातही यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या 5 महिने आधी भाजपने मुख्यमंत्री चेहरा बदलून मनोहर लाल खट्टर यांच्या जागी ओबीसी चेहरा नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं. मात्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का देण्यात आली हे दहा मुद्द्यांमधून समजून घेऊ.
1. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील अनुभवी नेते असून, ते आता सहाव्या वेळा आमदार आहेत. सरकारमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चेहरा देण्याची जोखीम पत्करणं भाजपसाठी धोकादायक ठरू शकलं असतं.
2. फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2022 पासून ते आतापर्यंत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. फडणवीस 1999 पासून दक्षिण पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. यावेळी त्यांनी सहाव्यांदा निवडणूक जिंकली आहे. याआधी ते नागपूर महापालिकेचे महापौरही होते.
3. देवेंद्र फडणवीस यांना 2019 मध्ये खऱ्या राजकीय परीक्षेला सामोरे जावं लागलं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आणि उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर राजकीय उलथापालथ झाली, तेव्हा फडणवीस खंबीरपणे उभे राहिले आणि निवडणुकीपूर्वी भाजपने उद्धव ठाकरेंना कोणताही शब्द दिला नव्हता हे त्यांनी ठामपणे सांगितलं.










