Maharashtra Assembly Election 2024: 288 मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची संपूर्ण यादी
काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा समावेश असलेली महाविकास आघाडी (MVA) 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या विरोधात लढत आहे. पाहा त्यांची संपूर्ण यादी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती जागा?

पाहा कोणत्या मतदारसंघात महाविकास आघाडीचा कोण उमेदवार

महाविकास आघाडीचं महायुतीसमोर तगडं आव्हान
मुंबई: 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. ज्यामध्ये महायुती पुन्हा राज्याची सत्ता मिळविण्यासाठी जनतेसमोर जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील राज्याची सत्ता आपल्या हाती यावी यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. विशेषत: महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतील 48 पैकी 30 जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी सत्ताधारी महायुतीला 17 जागांवरच विजय मिळवता आला होता. तर महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा आणि एक जागा अपक्षाने जिंकली होती.
आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 102 जागांसह सर्वाधिक जागा लढवत आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे अनुक्रमे 96 आणि 87 जागा लढवत आहेत आणि मित्र पक्षांना तीन जागा देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा>> Vinod Tawde : भाजपचा विरोध असूनही नवाब मलिक यांना अजितदादांकडून उमेदवारी? तावडे म्हणाले आम्ही...
महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागा मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता आला. त्यापाठोपाठ त्यांचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनुक्रमे 44 आणि 54 जागा मिळाल्या होत्या.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली होती. पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापन करत आपलं सरकार राज्यात आणलं.