Ravindra Waikar : वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? 'निकाल' संशयाच्या भोवऱ्यात!
Ravindra Waikar News : लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ईव्हिएमचा मुद्दा उलचून धरला होता. मात्र लोकसभेचा निकाल लागताच हा मुद्दा गायब झाला होता. आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील घडामोडीनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आता ईव्हिएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
Ravindra Waikar, Mumbai North West Lok Sabha Result : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील मतमोजणी वादात सापडली आहे. कारण आता मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला आहे. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचा निकाल संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आणि रविंद्र वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (north west mumbai lok sabha election result 2024 ravindra waiker kin using mobile phone that unlock ev machine rahul gandhi aditya thackeray reaction)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी ईव्हिएमचा मुद्दा उलचून धरला होता. मात्र लोकसभेचा निकाल लागताच हा मुद्दा गायब झाला होता. आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील घडामोडीनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना युबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा आता ईव्हिएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा : पुण्यातील PNG ज्वेलर्सच्या कॅलिफोर्नियातील शोरुमवर दरोडा! पाहा CCTV व्हिडीओ
खरं तर टेस्लाचे सीईओ, एक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आज ''आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) काढून टाकली पाहिजेत. मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका'' असल्याचे ट्विट केले होते. एलॉन मस्कचे हेच ट्विट राहुल गांधी यांनी वायकरांच्या नातेवाईकांवरील कारवाईच्या बातमीच्या कात्रणासह ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी 'भारतातील ईव्हीएम हा एक "ब्लॅक बॉक्स" आहे आणि कोणालाही त्यांची छाननी करण्याची परवानगी नसल्याचे म्हणत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, असे देखील राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हे वाचलं का?
आदित्य ठाकरेंचे ट्विट जसच्या तसं
गद्दार हा गद्दारच असतो... उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड- निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की तो आणखी एक चंदिगडचा क्षण टाळण्याचा प्रयत्न करत आहे.आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आमची लोकशाही संपवायची आहे आणि आमची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. "संपूर्ण तडजोड", "निवडणूक आयोग" नव्हे तर EC चा नवीन अर्थ काय आहे.
हे ही वाचा : Recruitment: भरपूर पगाराची सरकारी नोकरी; भारतीय तटरक्षक दलात सुवर्णसंधी!
दरम्यान आता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या नेत्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
प्रकरण काय?
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झाले होते. त्यांनी अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव केला होता. यानंतर अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता. आणि निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT