Ramdas Kadam : 'शिवसेनेला 100 जागा द्या', रामदास कदमांची भाजपकडे मागणी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

ramdas kadam criticize bjp and ajit pawar ncp worli dome theater shiv sena vardhapan din eknath shinde
वरळीच्या डोममध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचा वर्धापण सोहळा सुरू आहे.
social share
google news

Ramdas Kadam News: ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर करायचो, त्या ठिकाणी भाजप उडी मारायची आमची जागा, आमची जागा. जर आम्हाला संधी दिली असती तर हेमंत पाटील, भावना गवळी जिंकून संसदेत पोहोचल्या असत्या, असा हल्ला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर चढवला. तसेच अजितदादांचे घाईघाईत स्वागत झाले. त्यांच्या प्रवेशाला उशीर झाला असता तर बरे झाले असते, असा टोला देखील रामदास कदम यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला. (ramdas kadam criticize bjp and ajit pawar ncp worli dome theater shiv sena vardhapan din eknath shinde) 

ADVERTISEMENT

वरळीच्या डोममध्ये एकनाथ शिंदे (Eknath shinde) शिवसेनेचा वर्धापण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यातून रामदास कदम यांनी मित्रपक्ष भाजप आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ''निवडणुकीच्या दोन महिने आधी 15 उमेदवार जाहीर केले असते तर चांगले निकाल मिळू शकले असते आणि सर्व जागांवर विजय मिळवता आला असता, असे रामदास कदम यांनी म्हटले.

हे ही वाचा : Narayan Rane : ''नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले, निवड रद्द करा''

 भाजपने आम्हाला काही विद्यमान उमेदवार बदलण्यास भाग पाडले ज्याचा आमच्यावर विपरीत परिणाम झाला. ज्या क्षणी आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले, त्या क्षणी भाजप उडी मारायची आणि त्या जागांवर आपला दावा करायची. त्यामुळे आम्हाला संधी दिली असती तर हेमंत पाटील, भावना गवळी जिंकून संसदेत पोहोचसे असले, अशी टीका रामदास कदम यांनी भाजपवर केली. 

हे वाचलं का?

आमचे तिसरे साथीदार ‘दादा’ (अजित पवार) यांचे घाईघाईत स्वागत झाले. त्यांच्या प्रवेशाला उशीर झाला असता तर बरे झाले असते, असा टोला रामदास कदम अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला. तसेच आता लवकरात लवकर विधानसभेच्या 100 जागांची मागणी करावी, जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना किमान 90 जागा जिंकता येतील, असे रामदास कदम म्हणालेत,

शिवसेनेला 58 वर्षे झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा काहीही सहभाग नाही. तर यासाठी हजारो शिवसैनिकांचा हात आहे. यासाठी हजारो शिवसैनिकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. आम्हाला ठाकरेंसारखे आयते आसन मिळाले नाही, असा चिमटा देखील रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना काढला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 'महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं येईल सरकार', भाजपचं टेन्शन वाढलं!

हिंदूहृदयसम्राट म्हणून ज्यांची देशभरात नाव आहे. त्यांच्याच मुलांनी आज हिंदू शब्दाचा मान राखला नाही. ते स्वतःच हिंदूविरोधी काम करू लागले, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरेंना काँग्रेसने केवळ मतांसाठी राबवून घेतलं आहे. तरी देखील उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले. मोदी हे मुस्लिमविरोधी नाहीत. जनतेच्या विकासासाठी तत्पर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जाऊन ठाकरेंनी चूक केली आहे,असे देखील रामदास कदम म्हणाले 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT