Sneha Dube: हितेंद्र ठाकूरांचा गड खालसा करणारी मर्दानी... सासऱ्यांचा खून, अन्...
भाई ठाकूरांचा भाऊ हितेंद्र ठाकूर यांना थेट भिडणाऱ्या या मर्दानीने आपल्या सासऱ्यांचा खुनाचा वचपा कसा घेतला हा आता वसई-विरारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हितेंद्र ठाकूरचा गड खालसा करणाऱ्या स्नेहा दुबे कोण?

काय होतं सुरेश दुबे प्रकरण?

स्नेहा दुबे यांच्या विजयाची काय होतेय चर्चा?
Sneha Dube BJP : वसई: वसई आणि नालासोपारा हे दोन मतदारसंघ ठाकूर कुटुंबीयांचे राजकीय गड होते. मागील अनेक वर्ष हितेंद्र ठाकूर आणि त्याचे पुत्र क्षितीज ठाकूर हेच निवडून येत होते. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकूरांना असा काही झटका दिला की, त्याचा गड पूर्णपणे खालसा झाला. पण यातही वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे. भाई ठाकूरांचा भाऊ आणि विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांना थेट भिडणाऱ्या या मर्दानीने आपल्या सासऱ्यांचा खुनाचा वचपा कसा घेतला हा आता वसई-विरारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
स्नेहा दुबे या दिवंगत सुरेश दुबे यांच्या स्नुषा आहेत. जमिनीच्या वादातून सुरेश दुबे यांची 1989 साली नालासोपारा रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून दुबे कुटुंबीय हे ठाकूरांविरोधात न्यायलयीन लढाई लढत होतं.
हे ही वाचा >>Assembly Election Results : पवार Vs पवार आणि ठाकरे Vs शिंदे, किती ठिकाणी लढले, किती आमदार पाडले? वाचा सविस्तर
असं असताना दुसरीकडे त्यांनी आपली राजकीय लढाई देखील सुरू केली. ज्यामध्ये यंदा स्नेहा दुबे यांनी यंदा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी स्नेहा दुबे फक्त लढल्याच नाही तर त्यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा दणदणीत पराभवही केला. हा पराभव म्हणजे ठाकूरांच्या आजवरच्या वर्चस्वाला धक्का समजला जात आहे.
काँग्रेसचे नेते युवराज मोहितेंची स्नेहा दुबेंबाबतची पोस्ट जशीच्या तशी...
स्नेहा दुबे यांनी जो विजय मिळवला त्यानंतर त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचा हाच फोटो आणि सुरेश दुबे यांच्या हत्येची नेमकी कहाणी ही युवराज मोहिती यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. वाचा ती पोस्ट जशीच्या तशी...