Madhurimaraje : ज्यांनी माघार घेतल्यानं कोल्हापुरात राडा, त्या मधुरिमाराजे कोण? किती निवडणुका लढल्या? कारकीर्द कशी?
पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे खमके नेते म्हणून ओळख असलेल्या सतेज पाटलांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि व्हिडीओ काही मिनिटात महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याआधी मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेताना झालेला राडाही महाराष्ट्राने पाहिला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मधुरिमा राजे यांनी निवडणुका लढवल्या?
सतेज पाटील कुणावर आणि का संतापले?
मधुरिमा राजेंची राजकीय पार्श्वभूमी काय?
Madhurimaraje Profile : काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून माघार घेतली आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये एक मोठा ट्विस्ट आला. पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे खमके नेते म्हणून ओळख असलेल्या सतेज पाटलांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि व्हिडीओ काही मिनिटात महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याआधी मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेताना झालेला राडाही महाराष्ट्राने पाहिला. मात्र ज्यांच्यामुळे घटनांची ही सर्व मालिका सुरू झाली त्या मधुरिमाराजे नेमक्या कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. काँग्रेस खासदार शाहू महाराज यांच्या त्या सून आहेतच, मात्र त्यांच्या माहेरकडूनही त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. (Who is Madhurima raje all you need to know about kolhapur north vidhan sabha disputes)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Crime News : 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करताना डायमंड फॅक्ट्रीच्या मॅनेजरचा मृत्यू! नेमका प्रकार काय?
कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा तिकीट वाटपापासूनच चर्चेत राहिला. राजेश लाटकर यांना दिलेली उमेदवारी मागे घेतल्यानं हा मतदारसंघ चर्चेत आला होता. या मतदारसंघातील मधुरिमाराजे यांचे समर्थक असलेल्या काही माजी नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर अवघ्या काही तासांत राजेश लाटकर यांची उमेदवारी बदलून ती मधुरिमाराजे यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानं पुन्हा राडा झाला. या सर्व गोष्टींसाठी ज्यांना कारणीभूत ठरवलं जातंय, त्या मधुरिमा राजे कोण आहेत? जाणून घेऊ.
हे वाचलं का?
कोण आहेत मधुरिमा राजे?
मधुरिमा राजे छत्रपती यांना मोठा राजकीय वसा आहे. कोल्हापुरातील छत्रपती घराण्याच्या त्या सून असून, काँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांच्या सून आणि मालोजीराजे छत्रपती यांच्या त्या पत्नी आहेत. दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या त्या कन्या असल्यानं त्यांना जन्मापासूनच राजकीय वारसा मिळाला आहे. त्यामुळे मधुरिमाराजे यांना दिग्विजय खानविलकर यांची कारकीर्द जवळून पाहता आली आहे. मधुरिमा राजे या कोल्हापुरातील छत्रपती घराण्यात आल्यानंतर त्यांचा कोल्हापुरातील सामान्य माणसांमध्ये चांगला वावर होता. गेल्या 2 दशकांपासून त्या कोल्हापूरमध्ये सक्रीय आहेत. तर दुसऱ्या बाजूला दिग्विजय खानविलकर यांना मानणाराही एक मोठा गट कोल्हापूरमध्ये आहे.तर दुसरीकडे मालोजीराजेही वेगवेगळ्या उपक्रमांच्या, संस्थांच्या माध्यमातून कोल्हापू्मध्ये सामाजिक कामात सक्रीय असतात. एकूणच या सर्व गोष्टींमुळे त्यांना विधानसभेला उमेदवारी मिळवून देण्यासाठी मधुरिमाराजेंचे समर्थक आग्रही होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Raj Thackeray Vs Eknath Shinde : शिंदे मुलाखतीत बोलले, आता राज ठाकरे भर सभेत बरसले; माहिममुळे अंतर वाढलं? वाचा सविस्तर
दरम्यान, कोल्हापुरातील काही काँग्रेस नगरसेवकांच्या आग्रहास्तव मधुरिमा राजे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यासाठी आधीच तिकीट मिळालेल्या राजेश लाटकर यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान सतेज पाटलांसमोर होतं. मात्र अगदी काही तासात राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली. या गोष्टीची राज्यभर चर्चा झाली. काल 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यादिवशी दुपारी मधुरिमाराजे आणि मालोजीराजे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि एकच गोंधळ उडाला. यावेळी तिथे आलेल्या सतेज पाटील यांनी आक्रमक होत आपल्या भावनांचा बांध मोकळा करून दिला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT