नवनीत आणि रवी राणांवर मुंबई पोलिसांनी ‘याच’ कारणामुळे दाखल केला राजद्रोहाचा गुन्हा

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणारच असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर ते कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईत दाखल झाले. हे दोघेही मुंबईत आले तेव्हा शिवसेना विरूद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पाहण्यास मिळाला. त्यानंतर या दोघांनीही हनुमान चालीसा म्हणणार नाही असंही सांगितलं. मात्र या दोघांना अटक करण्यात आली. राजद्रोहाचं कलम या दोघांवर लावण्यात आलं आहे. ते का? याचं कारणच मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.

नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?

नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनी जामीन मिळावा म्हणून जो अर्ज करण्यात आला आहे त्या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. पण महाराष्ट्र सरकारमार्फत एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. राजद्रोहाचा गुन्हा आणि या दाम्पत्याला जामीन का मिळू नये? यासंदर्भातली भूमिका कोर्टासमोर ठेवण्यात आली आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजता मुंबईतल्या सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेतली जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यातर्फे उद्या महेश जेठमलानी हे बाजू मांडतील. महेश जेठमलानी हे भाजपचे खासदारही आहेत. तसंच एक निष्णात वकील म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. मात्र राजद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला आहे? याचं उत्तर आपण जाणून घेऊ.

ADVERTISEMENT

चौदा पानांचं प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आलं आहे. त्यात आपली भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्याला हनुमान चालीसा म्हणायची होती त्याबद्दल राजद्रोहाचा गुन्हा लावणं योग्य नाही असं राणा यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. राणा दाम्पत्य दावा करत आहेत की हनुमान चालीसा म्हणणार होते, हा दावा निष्पापपणाचा वाटत असला तरीही ज्या पद्धतीने त्यांनी हनुमान चालीसा एका खासगी घरासमोर म्हणण्यासाठी त्यांनी जी भूमिका घेतली ती अयोग्य होती.

ADVERTISEMENT

अशा पद्धतीने जाणूनबुजून आम्हाला हनुमान चालीसा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन म्हणायची आहे या म्हणण्यातून रवी राणा आणि नवनीत राणा हे एका मोठ्या षडयंत्रात सहभागी होते. मुंबईत आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल. महाराष्ट्राचे राज्यपाल या परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी अशी शिफारस करतील. या षडयंत्राचा भाग म्हणून राणा दाम्पत्याला हनुमान चालीसाचं पठण मातोश्रीसमोर करायचं होतं असं सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

एवढंच नाही तर भाजपला सरकार स्थापन करता आलं नाही म्हणून ते सरकारचा विरोध दर्शवत आहेत असा मुंबई पोलिसांचा अहवाल असल्याचंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. या मुद्द्यावर शनिवारी कोर्टात रणकंदन होऊ शकतं.

हनुमान चालीसा पठण करण्याचा आधार घेऊन राणा दाम्पत्याला समोरच्यांना आव्हान द्यायचं होतं. तुम्ही आम्हाला थांबवून दाखवा असाही त्यांचा दावा होता. सरकारने हे ही सांगायचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते हे महाराष्ट्र सरकारच्या धोरणांना विरोध करत आहेत. त्याचसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला टार्गेट केलं जातं आहे. याचा फायदा घेऊन इतर अपक्ष नेते हे देखील अशा पद्धतीचे मुद्दे जाणीवपूर्वक अजेंड्यावर घेत आहेत. कायद्याचा आधार न घेता आंदोलन केलं जातं आहे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT