Bandra Terminus Viral Video : मुलाला बेदम मारहाण, वांद्रे स्टेशनवरील प्रकरण काय?
वांद्रे रेल्वे स्थानकावर एका मुस्लीम मुलाला मारहाण केल्याचा प्रकार 21 जुलै रोजी घडला. या प्रकरणी आता जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
Muslim Boy Thrashed At Bandra Railway Station : वांद्रे टर्मिनस येथे अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत:हून दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन हिंदू मुलीसोबत दिसून आल्यानंतर जमावाने त्याला मारहाण केली. घोषणाबाजी करणाऱ्या जमावाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 21 जुलैचा असून हा व्हिडिओ 15 ऑगस्ट रोजी समोर आला होता.
ADVERTISEMENT
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर मुंबईच्या निर्मल नगर पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलिसांना पत्र पाठवले होते. अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलीला 10 ते 12 जणांच्या टोळक्याने 21 जुलै रोजी निर्मल नगर पोलीस ठाण्यात आणले होते. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या पालकांनी ठाण्यातील अंबरनाथ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
वाचा >> Mumbai : सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड
यानंतर निर्मल नगर पोलिसांनी अंबरनाथ पोलिसांना माहिती दिली आणि मुलगा आणि मुलीला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला अपहरणाच्या आरोपाखाली बाल न्याय न्यायालयात हजर केले.
हे वाचलं का?
वांद्रे मुलगा मारहाण प्रकरण
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी वांद्रे रेल्वे पोलिसांना सांगितले की, जमावाने वांद्रे जीआरपी कार्यक्षेत्रात मुलाला बेदम मारहाण केली आणि 21 जुलैला काय घडले ते देखील सांगितले. दुसरीकडे, वांद्रे जीआरपीने मुलाच्या वडिलांशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले की त्यांनी मुलाला त्याच्या मूळ गावी पाठवले आहे आणि तक्रार देण्यासाठी सायंकाळपर्यंत आलेले नाहीत.
वाचा >> Bindeshwar Pathak : ‘टॉयलेट मॅन’ची स्टोरी, ज्यांच्यापुढे अमेरिकेनेही पसरले होते मदतीसाठी हात!
आता वांद्रे जीआरपी 21 जुलै रोजी मुलावर हल्ला करणाऱ्या 10 ते 12 लोकांविरुद्ध तक्रार नोंदवत आहे. मुंबईच्या वांद्रे रेल्वे पोलीस स्टेशनने आयपीसीच्या कलम 141, 142, 143, 146, 147, 149, 323 अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सोशल मीडिया व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
त्या दिवशी काय घडलं?
मुंबईतील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर एका मुस्लिम मुलाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर काही लोक एका मुस्लीम मुलाला मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक पोलिस अधिकारी देखील दिसत आहे, ज्याने पीडित मुलाचा बचाव केला नाही.
ADVERTISEMENT
वाचा >> Sion Station : पत्नीला धक्का लागताच लगावली कानशिलात, प्रवाशाचा लोकलखाली चिरडून मृत्यू
मुस्लिम मुलगा एका हिंदू मुलीसोबत जात होता आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. वांद्रे स्थानकात सुमारे 8 ते 10 जणांनी “जय श्री राम” आणि “वंदे मातरम” च्या घोषणा देत मुस्लीम मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
A shocking viral video has come to light of a mob beating a young man at Bandra station while the crowd is happily filming the incident. The young man, a Muslim, was travelling in a train with a young Hindu girl (allegedly a minor) when the mob chanting ‘Jai Shri Ram’ hit him… pic.twitter.com/eQgTIUjxtl
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) August 16, 2023
वारिस पठाण काय बोलले?
ही घटना 21 जुलै रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही आणि अटकही झालेली नाही. व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एआयएमआयएम नेते वारिस पठाण म्हणाले की, जर कोणी चूक केली तर त्याच्यासाठी कायदा आहे, पण अशा प्रकारे मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? दरम्यान, निर्मल नगरच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT