सांगली : शेकोबा डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाची विष पिऊल आत्महत्या, तासगाव तालुक्यातली घटना

मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु, परिसरात खळबळ
सांगली : शेकोबा डोंगरावर दोन तरुणी आणि एका तरुणाची विष पिऊल आत्महत्या, तासगाव तालुक्यातली घटना
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणेराजुरी भागातील शेकोबा डोंगरावर आज दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या तिघांनीही विष पिऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

घटनास्थळी स्थानिकांना द्राक्ष बागेवर मारण्यात येणारं विषारी औषध सापडलं आहे. या घटनेत तिन्ही मयत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाहीये. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आत्महत्या केलेल्या या तीन व्यक्ती आहेत तरी कोण याचा तपास केला जात आहे.

गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आगामी काळात या आत्महत्येमागचं गुढ उकलण्यात पोलिसांना यश येतं का हे पहावं लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in