Gujrat | Morbi : मोरबी पूल दुर्घटनेत ६० जणांचे मृतदेह हाती; अद्यापही शेकडो लोक पाण्यातच!

मुंबई तक

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदारिया यांनी दिली. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याचही कुंदारिया यांनी सांगितलं. तसंच घटनास्थळावर पाणी उपसण्यासाठी मशीन्स आणण्यात आल्या असून अद्यापही शेकडो लोकांचं बचावकार्य सुरु आहे. यात आणखी काही मृतदेह मिळण्याची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती राजकोटचे खासदार मोहनभाई कुंदारिया यांनी दिली. मृतांमध्ये लहान मुलं, महिला आणि वयोवृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याचही कुंदारिया यांनी सांगितलं. तसंच घटनास्थळावर पाणी उपसण्यासाठी मशीन्स आणण्यात आल्या असून अद्यापही शेकडो लोकांचं बचावकार्य सुरु आहे. यात आणखी काही मृतदेह मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

मच्छू नदीवरील १४० वर्षपूर्वीचा जुना केबल पूल तुटल्याने रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे ४०० जण नदीत पडल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर लोकांना नदीपात्राबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबतच स्थानिक नागरिक देखील बचावकार्यात उतरले आहेत. याशिवाय या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून ५ जणांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp