नागपूर : घरगुती वादातून ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन ढकललं
घरगुती वादातून नवऱ्याने आपल्या ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन धक्का दिल्याची गंभीर घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत बाळाला कोणतीही दुखापत झालेली नसून पत्नीला किरकोळ जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सावनेर तालुक्यात पीडित महिला आपल्या आरोपी पतीसोबत राहत होती. दीड वर्षांपूर्वी यांचं लग्न झालं […]
ADVERTISEMENT

घरगुती वादातून नवऱ्याने आपल्या ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन धक्का दिल्याची गंभीर घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत बाळाला कोणतीही दुखापत झालेली नसून पत्नीला किरकोळ जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सावनेर तालुक्यात पीडित महिला आपल्या आरोपी पतीसोबत राहत होती. दीड वर्षांपूर्वी यांचं लग्न झालं होतं. सुरुवातीचा काहीकाळ चांगला गेल्यानंतर दोघांमध्येही वारंवार भांडणं वाढायला लागली. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आपल्या माहेरी राहत होती.
यावेळी रस्त्यावरुन काहीकामासाठी बाहेर पडलेली असता महिलेला आपला पती वाटेत भेटला. यावेळी पतीने आपल्या पत्नीला बाईकवर बस तुला माहेरी सोडतो असं सांगितलं. पत्नी आणि बाळासह बाईकवर बसल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर पतीने बाळासह पत्नीला बाकईकवरुन खाली ढकललं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून महिलेने या प्रकरणी सावनेर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर : रात्रपाळीवरुन आलेल्या बापाला पाण्याच्या पिंपात सापडला २५ दिवसांच्या बालकाचा मृतदेह