अनिल देशमुख वाद: सुप्रिया सुळे म्हणतात…, महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ‘अशा स्वरुपांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय. जेव्हा-जेव्हा यासारख्या गोष्टी घडतात तेव्हा-तेव्हा आम्ही दुखावलं जातो. त्यावेळी सत्तेत कोण आहे, कोण आरोप करतोय हे महत्त्वाचं नाही. पण त्यामुळे राज्याचं नाव खराब होतं त्याविषयी वाईट […]
ADVERTISEMENT

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ‘अशा स्वरुपांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचं नाव बदनाम होतंय. जेव्हा-जेव्हा यासारख्या गोष्टी घडतात तेव्हा-तेव्हा आम्ही दुखावलं जातो. त्यावेळी सत्तेत कोण आहे, कोण आरोप करतोय हे महत्त्वाचं नाही. पण त्यामुळे राज्याचं नाव खराब होतं त्याविषयी वाईट वाटतं.’
दरम्यान, या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखणच केल्याचं दिसून येतंय. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोरोना काळ असल्याने अनेक महिने हॉटेल आणि बार सुरु नव्हते. त्यामुळे गृहमंत्र्यांवर जे आरोप केले जात आहेत त्यांना काहीही अर्थ नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
मिठाचा खडा टाकण्याचं काम करु नका ! अजित पवारांचा संजय राऊतांना टोला
पाहा नेमकं काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे:
‘आरोपांबाबत आपण गंभीर असलं पाहिजे’