पोलिसांच्या गोळीबारात मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची सूत्रांची माहिती, एकूण 26 नक्षल्यांना कंठस्नान
नक्षलविरोधी करणाऱ्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 26 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस विभागाने अद्याप याबाबतची माहिती दिलेली नाही. या मोहिमेत सकाळपासून कारवाई सुरू होती. सुरूवातीला पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यानंतर आत्तापर्यंत एकूण 26 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पोलिसांनी गेल्या काही […]
ADVERTISEMENT

नक्षलविरोधी करणाऱ्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत एकूण 26 नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस विभागाने अद्याप याबाबतची माहिती दिलेली नाही. या मोहिमेत सकाळपासून कारवाई सुरू होती. सुरूवातीला पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला त्यानंतर आत्तापर्यंत एकूण 26 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पोलिसांनी गेल्या काही दिवसात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्यारापट्टी जंगलात 26 नक्षल्यांचा खात्मा, महाराष्ट्र पोलिसांची कारवाई
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मिलिंद तेलतुंबडे हा लेखक आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा मूळचा वणी येथील असून तो गेल्या काही वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याने भाकप माओवादी पक्षाचा महाराष्ट्र सचिव म्हणूनही काम केलं आहे. नक्षली नेत्यांमधल्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी तो एक होता. नक्षल्यांना सोपा रस्ता कोणता आहे आणि नक्षली नेत्यांसाठी सुरक्षित ठिकाण कोणतं असू शकतं हे शोधण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद तेलतुंबडेने विस्तार दलम नावाच्या कमांडो युनिटमध्ये 200 लोकांची भरती केली होती.