वाराणसीमध्ये मोठी दुर्घटना : गंगा नदीतील अहिल्याबाई घाटावर 34 भाविकांची नाव बुडाली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक मोठी दुर्घटना झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील गंगा नदीतील अहिल्याबाई घाटावर 34 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट शनिवारी सकाळी नदीत उलटली. मात्र आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे सर्व लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी अहिल्याबाई घाटासमोर 34 भाविकांनी भरलेली बोट अचानक बुडाली. बोट बुडाल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. आरडाओरडा सुरु होताच जवळ उपस्थित असलेल्या इतर बोटींसह एनडीआरएफ, पोलीसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि अथक प्रयत्नांनंतर बोटीतील प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर जखमींना जवळील कबीर चौरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, बोटीवरील सर्व प्रवासी हे दक्षिण भारतातील असल्याचे सांगितले जात असून ते सध्या वाराणसीच्या सहलीवर आहेत. तर अपघात होत असल्याचं पाहून बोटचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून संबंधित नाविकाविरोधात कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी सुरु केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रत्यक्षदर्शी राजेश तिवारी यांनी ‘आज तक’ला दिलेल्या माहितीनुसार, बोटीत किमान ३ डझनच्या आसपास लोक होते. बोट थोडी पुढे जाताच अचानक बोटीत पाणी भरू लागले. यानंतर बोटीचा मालक बोट सोडून पळून गेला आणि बोटीत उपस्थित असलेले लोक नदीत बुडू लागले. लोकांचा आरडाओरडा ऐकू येताच घटनास्थळी उपस्थित इतर नाविकांनी तत्परता दाखवत सर्वांना वाचवण्यास सुरुवात केली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT