नारायण राणेंना उच्च न्यायालयाने सुनावले खडेबोल; संत तुकारामांच्या अभंगाचा दिला दाखला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत खडेबोल सुनावले. याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायालयाने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने “नारायण राणे यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत,” असं म्हणत महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारशाची आठवण करुन दिली. ‘मुख्यमंत्र्यांना […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत खडेबोल सुनावले. याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायालयाने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचाही उल्लेख केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल न्यायालयाने “नारायण राणे यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत,” असं म्हणत महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय वारशाची आठवण करुन दिली. ‘मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन, हे लक्षात असू नये मी असतो तर त्यांच्या कानाखाली लगावली असती’ या नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यांवरुन त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील १० पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
अमित शाहांना फोन केल्याचं नारायण राणे धडधडीत खोटं बोलले; पोलिसांची न्यायालयात माहिती
यापैकी धुळ्याच्या प्रकरणात नारायण राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात नारायण राणे यांनी याचिका दाखल केलेली आहे. याच याचिकेवरील सुनावणीवेळी नारायण राणे यांचे न्यायालयाने कान टोचले.