Share market : गुंतवणूकदार झाले मालामाल! ३ रुपयांचा शेअर पोहोचला २१५ रुपयांवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात वेगानं बदल घडत असून, निर्देशाकांत घसरण झाल्याने असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. चांगले रिटर्न्स मिळण्याच्या अपेक्षेनं गुंतवणूक केलेल्यांचा अपेक्षाभंग झाला. शेअर मार्केटमध्ये भूकंप सुरू असताना एका कंपनीच्या शेअर्संनी गुंतवणूकदारांना मालामाल बनवलं आहे. ती कंपनी आहे व्ही गार्ड (V-Gaurd)!

काही वर्षांपूर्वी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त ३ रुपये इतकी होती. मात्र, आज त्यांनी किंमत २१५ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

व्ही-गार्ड (V- Gaurd Industries Limited) कंपनीने १३ वर्षांपूर्वी शेअर बाजारात पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त ३ रुपये इतकी होती. आज कंपनीच्या एका शेअरची किंमत २१५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे पूर्वीच्या किंमतीशी आजच्या किंमतीची तुलना केल्यास कंपनीचे शेअर्सचा रिटर्न्स ७,०६६ टक्क्यांच्या वर आहे. शुक्रवारी एनएसई मार्केट बंद झालं तेव्हा व्ही-गार्डच्या शेअरची किंमत २१४.९० रुपये इतकी होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

२००९ मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये १,५०० रुपये गुंतवले असतील. त्यांची गुंतवणूक आज कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचली असेल. १३ वर्ष या कंपनीत पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार शेअर बाजारात पडझड सुरू असतानाही आता प्रचंड फायद्यात राहिले आहेत.

निर्देशांकात १४३ अंकाची घसरण

ADVERTISEMENT

शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाल्याचं बघायला मिळालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईचा निर्देशांक १४३ अंकानी घसरला. त्यामुळे बीएसई निर्देशांक ५८,६४४ वर आला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात निफ्टी निर्देशांक ४४ अंकांनी घसरून १७,५१६ वर बंद झाला.

ADVERTISEMENT

सकाळी शेअर बाजार खुला झाल्यानंतर लगेच निर्देशांकाने १३० अंकांनी उसळी घेतली होती. बीएसईच्या ३० शेअर्सपैकी ११ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १९ मध्ये घसरण झाली आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, कोटक बँक, बजाज फिनसर्व, पावरग्रिड या कंपनाचे शेअर घसरले. त्याचबरोबर टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्राच्या शेअर्सच्या किंमतीतही घट झाली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT