भाजप-शिवसेना काढणार ‘सावरकर गौरव यात्रा’; कसं असणार स्वरुप?

मुंबई तक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ADVERTISEMENT

Chief Minister Eknath Shinde has announced that he will organize 'Savarkar Gaurav Yatra' across the state
Chief Minister Eknath Shinde has announced that he will organize 'Savarkar Gaurav Yatra' across the state
social share
google news

Bjp | Shivsena : 

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryaveer savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात शिवसेना-भाजपकडून (Shivsena-Bjp) निषेध केला जात आहे. आता याच निषेधाचा एक भाग म्हणून राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ आयोजित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी केली. ते आज (सोमवारी) तातडीच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. (Chief Minister Eknath Shinde announced that ‘Savarkar Gaurav Yatra’ will be organized across the state)

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, सावरकर यांच्या त्यागासाठी आणि देशभक्तीसाठी राज्यभरात आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा सुरू करत आहोत. जिल्हे, तालुके, विधानसभा मतदारसंघ, गावागावातून ही गौरव यात्रा काढली जाईल. यात आम्ही राहुल गांधी यांनी सावरकरांच्या वारंवार केलेल्या अपमानाचा आम्ही यामध्ये निषेध करु.

हेही वाचा : ‘Uddhav Thackeray तोंडाच्या वाफा काढू नका; हिंमत असेल तर…’ : बावनकुळेंनी ललकारलं

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तेला लाथ मारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यामुळे फक्त भाषणात सावरकर जिवंत राहतील. कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक जिल्हा, तालुका, विधानसभा मतदारसंघ आणि गावागावातून एकीकडे आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करु. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून सावरकरांनी केलेलं कार्य आम्ही पुन्हा समाजासमोर आणू आणि त्यांचा गौरव करु.

हे वाचलं का?

    follow whatsapp