उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवाब मलिक आणि नितेश राणेंना भर सभेत सुनावले खडे बोल
राकेश गुडेकर, रत्नागिरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव न घेता दोघांनाही खडेबोल सुनावले आहेत. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘म्यॉव, म्यॉव’ आवाज काढत मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर करुन […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर, रत्नागिरी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव न घेता दोघांनाही खडेबोल सुनावले आहेत. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून ‘म्यॉव, म्यॉव’ आवाज काढत मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचलं होतं. तर त्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर करुन नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. याच सगळ्या वादावरुन आता अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांना सुनावलं आहे. रत्नागिरी जवळच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या जाहीर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
अजित पवारांनी काय सुनावलं?
अजित पवार म्हणाले की, ‘आम्ही वचनपूर्तीचे राजकारण करणारे नेते आहोत. सध्या सोशल मीडियावरून कोण कोंबड्याला मांजर करतंय तर कुणी मांजराला कोंबडा करतंय. यातून कोकणच्या विकासाचे मुद्दे सुटणार आहेत का? हे असं कुणीच करू नये.’
असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले आहेत.