जमशेदपूरच्या टाटा स्टिल प्लांटला भीषण आग, दोन जण जखमी

मुंबई तक

जमशेदपूरच्या टाटा स्टिल प्रकल्पाला आग लागली आहे. गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली आहे. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना टाटा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी १०. २० च्या सुमारास गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही आग लागली. टाटा स्टिलने याबाबत स्टेटमेंट काढून ही माहिती दिली आहे. ANI या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

जमशेदपूरच्या टाटा स्टिल प्रकल्पाला आग लागली आहे. गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली आहे. या घटनेत दोन कामगार जखमी झाले आहेत. या कामगारांना टाटा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आज सकाळी १०. २० च्या सुमारास गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन ही आग लागली. टाटा स्टिलने याबाबत स्टेटमेंट काढून ही माहिती दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

जमशेदपूर टाटा स्टिल फॅक्टरीत कोक प्लांटमध्ये आग लागली. सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. त्यानंतर कोक प्लांटमधला बॅटरी ६ हा भाग बंद करण्यात आला आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. वणवा पेटण्यासह काही कंपन्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज काल आणि आज सलग दोन दिवस मुंबईत आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. तर काल नाशिकमध्येही 30 ते 40 एकरावर आग लागल्याची घटना घडली आहे.

हे वाचलं का?