देगलूरमध्ये शिवसेनेचा माजी आमदार भाजपच्या गळाला; पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर
नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दोन वेळा आमदार राहिलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर केली आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघात ३० ऑक्टोबर पोटनिवडणूक होत असून, भाजपन शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम […]
ADVERTISEMENT

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दोन वेळा आमदार राहिलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी जाहीर केली आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघात ३० ऑक्टोबर पोटनिवडणूक होत असून, भाजपन शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना तिकीट दिलं आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, भाजपने शिवसेनेच्याच नेत्याला गळाला लावत आघाडीसमोर आव्हान उभं केलं आहे.
रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेल्या सुभाष साबणे यांना पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
सुभाष साबणे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, अचानक भाजपने तिकीट जाहीर केल्यानंतर ते शिवसेना सोडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.