Sanjay Raut : कायदा आणि घटना राज्यपालांना शिकवा; संजय राऊत ‘राणां’वर भडकले
मातोश्रीवर जाऊन हनुमान पठण करण्याचा हट्ट खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सोडला. राणा दाम्पत्यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेनं पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांचा दौरा सांगून बंटी आणि बबलीने पळ काढला, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली. राणा दाम्पत्यांच्या माघारीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. […]
ADVERTISEMENT

मातोश्रीवर जाऊन हनुमान पठण करण्याचा हट्ट खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सोडला. राणा दाम्पत्यांच्या या निर्णयानंतर शिवसेनेनं पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांचा दौरा सांगून बंटी आणि बबलीने पळ काढला, अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली.
राणा दाम्पत्यांच्या माघारीच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, “काही बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचन. मातोश्रीमध्ये घुसून हनुमान चालीसा वाचणं. अशा प्रकारची भाषा नुसती वापरली नाही, तर जणू काय महान योद्धे, सत्यवादी आहोत अशा प्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले. त्यांनी थोडा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.”
Shiv Sena: ‘येऊ दे राणा.. मैं झुकेंगा नही..’, 80 वर्षीय आजीबाईंनी ‘मातोश्री’समोर ठोकला तळ
“मला आता समजलं की पंतप्रधानांचा मुंबईत दौरा आहे आणि त्या दौऱ्याला गालबोट लागू नये, या सबबीखाली त्यांनी पळ काढला. आंदोलन मागे घेतलं म्हणजे पळ काढला, शेपूट घातलं. पंतप्रधानांचा दौरा आहे. त्या दौऱ्याची जबाबदारी ही राज्य सरकारची, महाराष्ट्राची तर आहे. ते एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत. आमचेही आहेत. आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे. पंतप्रधानांच्या गालबोट लागू नये, लागावा असं महाराष्ट्राला किंवा शिवसेनेला कधीच वाटणार नाही. उलट लागणार असेल, तर तिथे सरकार काय शिवसेना पंतप्रधानांचं रक्षण करण्यासाठी ठामपणे उभी राहिल. जे गालबोट लावू इच्छितात, त्यांचा समाचार घेण्यासाठी.”