जर तुमचा पगार 50,000 रुपये असेल तर PF वरील व्याज कपातीमुळे होईल खूप नुकसान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांच्या भविष्याची हमी मानल्या जाणाऱ्या पीएफ ठेवीवरील (PF Deposit) व्याजदर (Rate of Intrest) कमी करण्याचा निर्णय EPFO ​​ने घेतला आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल, तर जाणून घ्या की त्याला एका वर्षात त्याच्या पीएफ ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेत किती नुकसान होईल. सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे EPFO ​​ने व्याजदर 8.5 वरून 8.1 टक्के एवढा केल

पीएफसाठी तुमच्या पगारातून किती रक्कम कापली जाते?

कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम त्याच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. त्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा 50,000 रुपये असेल, तर सध्याच्या नियमानुसार, त्याचे कमाल मूळ वेतन (एकूण पगाराच्या 40%) दरमहा 20,000 रुपये असेल. अशाप्रकारे दर महिन्याला त्याच्या पीएफ खात्यात 2,400 रुपये जमा होतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पीएफमध्ये कंपनी किती पैसे टाकते?

पीएफ खात्यात संबंधित कंपनीला देखील 12% योगदान द्यावे लागते. परंतु यापैकी 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन फंड (EPS फंड) मध्ये जाते आणि उर्वरित 3.67% रक्कम पीएफ खात्यात जाते. त्यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50,000 रुपये असेल, तर मूळ वेतनानुसार, कंपनी त्याच्या पीएफ खात्यात 734 रुपये जमा करेल.

ADVERTISEMENT

तर उर्वरित 1,666 रुपये त्याच्या पेन्शन खात्यात जातील. परंतु कंपनी एखाद्या पेन्शन खात्यात दरमहा जास्तीत जास्त 1,250 रुपयेच जमा करू शकतो. त्यानुसार उर्वरित 416 रुपयांची रक्कमही कर्मचाऱ्याच्या पीएफ फंडात जाईल. यावर, कंपनीकडून दरमहा 1,150 रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा केले जातील.

ADVERTISEMENT

एका वर्षात ‘एवढा’ पीएफ होईल जमा

आता तुमचा पगार दरमहा 50,000 रुपये असल्यास, तुमच्या आणि तुमच्या कंपनीच्या योगदानासह, दरमहा तुमच्या पीएफ खात्यात 3,550 रुपये जमा होतील. अशा प्रकारे, एका वर्षात तुमच्या पीएफ खात्यात एकूण 42,600 रुपये जमा होतील. जर तुमचा मूळ पगार दरमहा फक्त 50,000 रुपये असेल, तर या संपूर्ण गणनेनुसार, तुमचा वर्षभराचा पीएफ 1.29 लाख रुपये असेल.

देशातील ६ कोटी कर्मचाऱ्यांना झटका! ४० वर्षात PF वर मिळणार सर्वात कमी व्याज

व्याजातून मिळणारे उत्पन्नात होणार घट

तुमचा पगार 50,000 असल्यास, गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये PF वर उपलब्ध असलेल्या 8.5% व्याजदरानुसार, तुम्हाला तुमच्या एकूण PF ठेवीवर 3,621 रुपये व्याज उत्पन्न मिळाले असते. आता EPFO ​​ने 2021-22 साठी हा व्याजदर 8.1% पर्यंत कमी केला आहे. अशा प्रकारे, आता तुमचे व्याज उत्पन्न 3,450.60 रुपये होईल. अशा प्रकारे, तुमचे व्याज उत्पन्न एका वर्षात 170.40 रुपयांनी कमी होईल.

EPFO देशातील सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या पीएफ निधीचे व्यवस्थापन करते. त्याची निर्णय घेणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने शनिवारी PF फंडावरील व्याजदर 8.1% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावर अद्याप केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झालेलं नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT