असंं पहिल्यांदाच घडलं.. स्वत: कॉलेजनं कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांची नावं कॉलेजबाहेर झळकवली!

Kalyan: कल्याणमधील एका कॉलेजने कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांचं नाव कॉलेजने थेट प्रवेशद्वारावर झळकवलं आहे.
असंं पहिल्यांदाच घडलं.. स्वत: कॉलेजनं कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांची नावं कॉलेजबाहेर झळकवली!
in kalyan names of the teachers who took less lectures were flashed outside the college

कल्याण: विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आपल्या आवारात लावतं जातात. तर कधीकधी पुरेशी अटेंडस नसणाऱ्या किंवा लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीच थेट बोर्डावर लावली जाते.

मात्र, कल्याणमधील अग्रवाल कॉलेजमध्ये कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांच्या नावाचा थेट फलकच कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आला आहे. याचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

कॉलेजने लेक्चर कमी घेणाऱ्या प्राध्यापकांची यादीचा फलक कॉलेजच्या आवारात लावला आहे. सध्या हा फलक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रकार कल्याणमधील नामांकित K.M. Agarwal कॉलेजमध्ये घडला आहे.

जुलै ते नोव्हेंबर कमी लेक्चर घेणाऱ्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांची यादी कॉलेजच्या गेटवर लावण्यात आली आहे. ही यादी विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

याबाबत कॉलेज प्रशासनाने कॉलेज शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. काही प्राध्यापकांची कामगिरी कमी आहे. त्यांच्या आत्मपरिक्षणासाठी व त्यांच्या कार्यात सुधारणा होण्याकरीता हा प्रकार केला आहे. त्यांच्या विरोधात तूर्तास तरी कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं सांगितलं आहे.

पाहा या प्रकाराबाबत कॉलेज प्रशासनाचं नेमकं म्हणणं काय

'आमचं कॉलेज हे स्थापनेपासून शिक्षण देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. उच्च शिक्षणात आपण पाहिलं असेल की, गेल्या दहा-पंधरा वर्षात आमचा निकाल हा 98-99 टक्के आहे ज्युनिअर कॉलेजचा. आमचा एकूण 200 ते 225 लोकांचा स्टाफ आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून. ते सर्व चांगले आहेत. त्याबद्दल काही शंका नाही.'

'तरी कधी-कधी आपण कमी पडतो. तीच गोष्ट आपल्या लक्षात येण्यासाठी आम्ही कमी लेक्चर घेणाऱ्या शिक्षकांची नावं डिस्प्ले केली आहेत. जेणेकरुन त्यांना जाणीव व्हायला हवी की, ते कुठे कमी पडत आहेत. त्या शिक्षकांवर आम्ही काही कायदेशीर कारवाई केलेली नाही. फक्त एक डिस्प्ले केलं आहे की, तुमचं कुठं चुकतं आहे.' अशी प्रतिक्रिया अग्रवाल कॉलेजचे ट्रस्टी मुन्ना पांडे यांनी दिली आहे.

in kalyan names of the teachers who took less lectures were flashed outside the college
पुण्यात कॉलेज सुरू; उच्च शिक्षण मंत्री म्हणतात, 'अजून आदेशच काढला नाही'

दरम्यान, कॉलेज प्रशासनाने ज्या प्रकारे शिक्षकांची नाव थेट फ्लेक्स लावून झळकवली आहेत त्यामुळे त्या संबंधित शिक्षकांबाबत विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा मेसेज जाण्याची शक्यता आहे. याबाबत काही जणांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in