Ind vs Aus : चौथ्या कसोटीत काय होणार, टीम इंडियाला विजयाची आशा?

मुंबई तक

India vs Australia 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात रंगलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही संघाचा पहिला डाव पुर्ण झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे हा सामना ड्रॉच्या दिशने वळताना दिसत आहे. मात्र पाचव्या दिवशी जर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

India vs Australia 4th Test : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात रंगलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दोन्ही संघाचा पहिला डाव पुर्ण झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे हा सामना ड्रॉच्या दिशने वळताना दिसत आहे. मात्र पाचव्या दिवशी जर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) या स्पिनर जोडीने करीश्मा करून दाखवला तर नक्कीच टीम इंडियाला विजयाची संधी असणार आहे. (ind vs aus 4th test match reach to draw ravichandran ashwin and ravindra jadeja can do the magic)

टीम इंडियाने (Team India) पहिल्या डावाच 571 धावा केल्या होत्या. विराटच्या (Virat Kohli) 186 धावा, शुभमन गिलच्या 128 आणि अक्षर पटेलच्या 79 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या गाठलीय. या धावसंख्येसह टीम इंडियाने 91 धावांची आघाडी घेतलीय. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. आता टीम इंडियाचे बॉल त्यांना कमी धावात रोखून विजय साकारतात का? हे पाहावे लागणार आहे.

Virat kohli Records: सचिन तेंडुलकरनंतर कोहलीच! वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने सुसाट

टीम इंडियाच्या गोलंदाजांवर दारोमदार

टीम इंडियाच्या (Team India) बॉलर्सने जर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव स्वस्तात निपटवला तर टीम इंडियाला विजयाची संधी असणार आहे. टीम इंडियाच्या बॉलर्सनी जर ऑस्ट्रेलियाचे पहिल्या सेशनमध्ये विकेट काढले तर ते बॅकफुटवर जातील आणि एकामागून एक विकेट पडतील. ऑस्ट्रेलियाला जर 200 धावाच्या आता गुंडाळलं तर टीम इंडियाला सहज मिळवता येणार आहे. मात्र यासाठी अश्विन- जडेजा या स्पीनर जोडीने आणि शमी – उमेश वेगवान गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली पाहिजे. तरच हे शक्य़ होणार आहे.

Ind Vs Aus: तीन वर्षानंतर अखेर प्रतिक्षा संपली, विराट कोहलीने ठोकलं शतक

पाचव्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि अश्विन (Ravichandran Ashwin) जोडीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. जर या जोडगुळीने ऑस्ट्रेलियाला सुरूवातीला धक्के दिले तर हा सामना ड्रॉ पासून वाचू शकतो.आतापर्यंत या मालिकेतील दोघांचा परफॉर्मन्स पाहता रविंद्र जडेजाने 17.36 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या आहेत, तर रविचंद्रन अश्विनने 15.62 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या आहेत. जडेजा-अश्विनसह मोहम्मद शमी, उमेश यादव आणि अक्षर पटेल जोडीमध्ये ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर टाकण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे गोलंदाज ऑस्ट्रेलियाला सामना ड्रॉ करण्यापासून रोखू शकतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

PSL: 33 षटकार अन् 500 पेक्षा जास्त धावा, दोन संघानी मिळून बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

दरम्यान चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत टीम इडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा सामना ड्रॉ होतो की टीम इंडियाला विजयाची संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरा टेस्ट सामना जिंकून WTC च्या फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. तर टीम इंडियाला चौथा टेस्ट सामना जिंकून हे स्थान पक्क करता येणार आहे. मात्र सामना ड्रॉच्या दिशेने जात असल्याने ते शक्य नसणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे श्रीलंका विरूद्ध न्यूझीलंड सामन्याकडे लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp