रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय! ‘स्पेशल ट्रेन’ होणार बंद; कोरोनापूर्वीचे तिकीट दर लागू
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी कोरोना स्पेशल एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. या स्पेशल रेल्वे गाड्या आता बंद करण्यात येणार असून, पूर्वीच्या एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबर आधीचे रेल्वेभाडेही लागू करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. […]
ADVERTISEMENT

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी कोरोना स्पेशल एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. या स्पेशल रेल्वे गाड्या आता बंद करण्यात येणार असून, पूर्वीच्या एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबर आधीचे रेल्वेभाडेही लागू करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. (Inidan Railways restores pre-Covid fares)
कोरोनाच्या दोन भयावह लाटांनंतर देश पूर्वपदावर आला असून, रेल्वेनंही नागरिकांच्या सुविधेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना परिस्थिती मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून, रेल्वेनं आता कोरोनापूर्व काळात धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात 1700 पेक्षा अधिक गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना आधी आकारले जाणारे भाडेदर लागू करण्यात आले आहेत. म्हणजे स्पेशल रेल्वेने प्रवास करण्यासाठी आकारले जाणारे भाडे आता बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता जनरल तिकीट पद्धतही बंद करण्यात आली आहे.
आरक्षण मिळालेल्या आणि वेटिंगवर असलेल्यांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाने परिपत्रकातून स्पष्ट केलं आहे. जनरल बोगीसाठीचं तिकीट असणार नाही. महत्त्वाची बाब म्हणजे निर्णय लागू होण्याआधी ज्यांनी तिकीट आरक्षित केलेले आहेत. त्यांच्याकडून वाढीव भाडं घेतलं जाणार नाही. त्याचबरोबर पैसेही परत केले जाणार नाही.
रेल्वे मंत्रालयाकडून एक्स्प्रेस गाड्या आणि भाडेदरात बदल करण्यात आले असले, तरी कोरोना प्रोटोकॉलचा नियम कायम असणार आहे. प्रवाशांना कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. 25 मार्च 2020 रोजी देशातील रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती.
166 वर्षांत पहिल्यांदाच रेल्वे सेवेला ब्रेक लागला होता. मात्र, हळूहळू रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. यात सर्वात आधी मालगाड्या आणि श्रमिक रेल्वे एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या.