पुणे हादरलं, बायको, मुलाची हत्या केली अन् IT इंजिनिअरने…
PUNE IT engineer Case: पुणे: पुण्याच्या (Pune) औंध परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 44 वर्षीय IT इंजिनिअर (IT engineer) असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या (Wife and son Murder) करून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. ज्यानंतर पुण्यात एकच […]
ADVERTISEMENT

PUNE IT engineer Case: पुणे: पुण्याच्या (Pune) औंध परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 44 वर्षीय IT इंजिनिअर (IT engineer) असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 8 वर्षाच्या मुलाची हत्या (Wife and son Murder) करून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. ज्यानंतर पुण्यात एकच खळबळ माजली. (it engineer in pune killed his wife and son and committed suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, औंध परिसरात राहणाऱ्या सुदिप्तो गांगुली आणि त्यांचं कुटुंब हरवल्याची तक्रार पुणे पोलिसांना मिळाली होती. याच तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांनाही हादरवून टाकणारी माहिती समोर आली.
पुण्याचे उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, औंध परिसररातील तिघे जण हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली. ही तक्रार मयत सुदिप्तो गांगुली यांच्या मित्राने बंगलोरहून दाखल केली होती.
तक्रारीनुसार सुदिप्तो गांगुली (वय 44 वर्ष) त्याची पत्नी प्रियांका गांगुली (वय 40 वर्ष) आणि मुलगा तनिष्क गांगुली (वय 8 वर्ष) हे हरवले आहेत असा निष्कर्ष त्यांच्या मित्रांनी काढला होता. कारण दोन दिवसांपासून सुदिप्तो, त्याची पत्नी आणि मुलगा यापैकी कोणीच फोन उचलत नव्हतं. त्यामुळेच मित्राने पुणे पोलिसांशी संपर्क साधून याप्रकरणी तक्रार दाखल केली.