धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार

प्रवाशांच्या मदतीने टीसीने सुखरुप काढलं बाहेर! दाम्पत्य मोठ्या दुर्घटनेतून बचावलं
धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार
सीसीटीव्ही कैद झालेलं दृश्य.

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटून पती-पत्नी चालत्या गाडी खाली गेल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ एक्स्प्रेसची चैन खेचण्यासाठी आरडाओरड केली. वेळीच चैन चैन खेचण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली गेलेल्या पती-पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. काही वेळाने दोघांना पुन्हा त्याच गाडीत बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलं.

सीसीटीव्ही कैद झालेलं दृश्य.
भयंकर! रेल्वे स्थानकातून नेलं निर्जनस्थळी; उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कल्याण स्थानकावर काय घडलं?

मंगळवारी सकाळी कल्याण स्थानकातून सकाळी नऊ वाजून 21 मिनिटांनी सुटणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी पती-पत्नी कल्याण स्थानकात आले होते. आरक्षित डब्बा पुढे गेल्यामुळे फलाटावरून धावत येऊन दोघेही एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते.

दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला होता, मात्र गाडीत चढताना तोल गेल्याने दोघेही फलाट आणि गाडीच्या मधल्या पोकळीतून गाडीखाली घसरले. प्रवाशांनी गाडीतील इतर प्रवाशांना साखळी ओढण्यास सांगून गाडी थांबवली. मात्र तोपर्यंत एक्स्प्रेसचे तीन डबे पुढे गेले होते.

सीसीटीव्ही कैद झालेलं दृश्य.
कल्याण CCTV व्हिडीओ : काळ आला होता, पण...; 'त्या' दोघी धावल्या म्हणून वाचले प्राण

गाडीचा वेग कमी असल्यानं चैन खेचताच गाडी थांबली. त्यानंतर स्थानकात ड्युटीवर असलेल्या तिकीट तपासणीस रंजित कुमार यांनी प्रवाशांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढलं. एक्स्प्रेसचे तीन डब्बे अंगावरून गेल्यानंतरही दोघेही सुखरूप बचावल्यानं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in