क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना भेटणार, नवाब मलिकांची तक्रार करणार
समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. नवाब मलिक यांनी जे आरोप गेल्या काही दिवसांपासून कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहे. नवाब मलिक हे नाहक आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत हे क्रांती रेडकर यांनी वारंवार सांगितलं आहे. […]
ADVERTISEMENT

समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. नवाब मलिक यांनी जे आरोप गेल्या काही दिवसांपासून कऱण्यास सुरूवात केली आहे, त्याबाबत ही भेट घेतली जाणार आहे. नवाब मलिक हे नाहक आपल्या कुटुंबाची बदनामी करत आहेत हे क्रांती रेडकर यांनी वारंवार सांगितलं आहे. इतकंच नाही तर आपण धर्म बदललेला नाही हे ज्ञानेश्वर वानखेडेंनी सगळी कागदपत्रं दाखवूनही सांगितलं आहे. तरीही नवाब मलिक यांनी आरोप थांबवले नाहीत म्हणून ही भेट घेतली जाणार आहे असं समजतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ पार्टी प्रकरण समोर आल्यापासून आणि आर्यन खानला अटक केल्यापासून ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असा आरोप केला आहे. तसंच समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत असंही त्यांनी वारंवार सांगितलं 2007 मध्ये त्यांनी एका मुस्लिम मुलीशी विवाह केला होता. नंतर त्यांनी तलाक घेतला. तसंच त्यांनी समीर वानखेडे यांचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असाच केला होता. यानंतर पत्रकार परिषद घेऊन क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडले होते. आता आज याच प्रकरणी क्रांती रेडकर आणि ज्ञानेश्वर वानखेडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत.
‘माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम’ नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं उत्तर