महाड: महिला सरपंचाच्या हत्येचा गुंता सुटला, 30 वर्षीय व्यक्तीला अटक; बलात्काराचाही गुन्हा दाखल
महाड: महिला सरपंचाच्या हत्येनंतर संपूर्ण महाड तालुक्यात खळबळ माजली होती. सोमवारी (27 डिसेंबर) झालेल्या या हत्या प्रकरणाचा आता छडा लावण्यात महाड पोलिसांना यश आलं आहे. संबंधित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात फेकून देण्यात आला होता. त्यामुळे महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. याच प्रकरणी महाड […]
ADVERTISEMENT

महाड: महिला सरपंचाच्या हत्येनंतर संपूर्ण महाड तालुक्यात खळबळ माजली होती. सोमवारी (27 डिसेंबर) झालेल्या या हत्या प्रकरणाचा आता छडा लावण्यात महाड पोलिसांना यश आलं आहे. संबंधित महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात फेकून देण्यात आला होता. त्यामुळे महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. याच प्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार करुन हत्येचा तपास सुरु केला होता. याच तपासात आता पोलिसांना यश मिळालं असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या तपासात फारसे पुरावे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी यासाठी डॉग स्कॉडची मदत घेतली. डॉग स्क्वॉडची कामगिरी या तपासात अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्याच आधारे पोलिसांनी अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) याला महाडमधील उवटआळी येथून अटक केली आहे.
महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरून आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं त्यांनी यावेळी आपल्या जबाबात सांगितलं आहे.
सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचा आरोप देखील आरोपीवर दाखल करण्यात आला आहे.