Omicron : साऊथ अफ्रिका, झिंबाब्वे, बोट्सवानामधून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दक्षिण अफ्रिका, झिंबाब्वे, आणि बोट्सवाना हे तीन देश हाय रिस्क या कॅटेगरीत टाकण्यात आले आहेत. कारण या देशांमध्ये कोरोनाचा Omicron हा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून काही नियम लागू केले आहेत. भारत सरकारने जे नियम लागू केले आहेत त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारनेही हे नियम लागू केले आहेत.

“High Risk Countries” म्हणून वर्गीकरण हा कोविड 19 च्या “ओमिक्रॉन” प्रकाराच्या विकसित परिस्थितीमुळे हे नियम महाराष्ट्र सरकारने आणले आहेत. यामध्ये काही बदल करायचे असल्यास ते आवश्यकतेनुसार केले जातील असंही महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे.

High Risk Countries म्हणजेच दक्षिण अफ्रिका, झिंबाब्वे आणि बोट्सवाना या देशातून येणाऱ्या नागरिकांना High Risk प्रवासी समजलं जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे या देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा म्हणजे ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव होतो आहे. या जोखमीच्या देशांच्या यादीत असलेल्या देशांमधून जे नागरिक महाराष्ट्रात येणार आहेत त्यांच्या बाबत सरकारने विशेष खबरादारी घेण्यास सुरूवात केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हाय रिस्क असलेल्या हवाई प्रवाशांना प्राधान्याने उतरवले जाऊ शकते आणि त्यांच्या तपासणी आणि पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर संबंधित विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल.

संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताबडतोब RTPCR चाचणी द्यावी लागेल आणि 7 व्या दिवशी दुसरी RTPCR चाचणी घेऊन अनिवार्य 7 दिवसांचे संस्थात्मक अलगीकरण आवश्यक

ADVERTISEMENT

RTPCR चाचणीपैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, अशा “हाय रिस्क एअर पॅसेंजर” ला कोविड उपचार सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवले जाईल.

ADVERTISEMENT

सातव्या दिवसाच्या RTPCR चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्यास, अशा “हाय रिस्क एअर पॅसेंजर” “ला आणखी 7 दिवस होम क्वारंटाईन केलं जाईल

डीसीपी इमिग्रेशन आणि एफआरआरओ गेल्या १५ दिवसांत भेट दिलेल्या देशांचा तपशील जाहीर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी घोषणापत्राचा मसुदा तयार करतील.

मुंबई विमानतळ मागील १५ दिवसांतील प्रवासासंबंधी माहितीचा प्रोफॉर्मा सर्व विमान कंपन्यांना शेअर करेल आणि आगमन झाल्यावर इमिग्रेशनद्वारे तपासले जाईल.

आदेशात हा इशारा देण्यात आला आहे की, प्रवाशाने चुकीची माहिती दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या संबंधित कलमांनुसार कारवाई केली जाईल

देशांतर्गत विमान प्रवासाच्या बाबतीत, प्रवाशांना एकतर पूर्णपणे लसीकरण करावे लागेल किंवा बोर्डिंग करण्यापूर्वी 72 तासांच्या आत नकारात्मक परिणाम दर्शविणारे RTPCR चाचणी प्रमाणपत्र अनिवार्यपणे सोबत ठेवावे लागेल

    follow whatsapp

    ADVERTISEMENT