एकनाथ शिंदेसह १६ जणांची आमदारकीच धोक्यात?; बंडखोरांना विधानसभा उपाध्यक्षांची नोटीस
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे. शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आव्हान देणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर विधानसभा उपाध्यक्षांनी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रक्रिया सुरू केली आहे असून, १६ आमदारांना नोटिसा बजावली आहे.
शिवसेनेच्या मागणीनंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधात सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असून, बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. बैठकीस अनुपस्थित राहिल्यास सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता.
याच मुद्द्यावरून शिवसेनेनं बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांविरोधात कारवाई सुरू केली. शिवसेनेनं यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यानंतर शिवसेनेनं दिलेलं पत्र स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी अशी कारवाई करता येते का याबद्दल कायदेशीर सल्ला मागवला होता.