सांगलीतील रँचो! दुचाकी इंजिनचा वापर करत बनवली चारचाकी; शेतीसाठी ठरणार फायदेशीर

मुंबई तक

– स्वाती चिखलीकर, सांगली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर चारचाकी गाडी तयार करण्याची किमया केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर तयार करण्यात आलेली ही चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार शकते. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येतात. वर्षभराच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या गाडीची अंतिम चाचणीही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्याच्या जोरावर चारचाकी गाडी तयार करण्याची किमया केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर तयार करण्यात आलेली ही चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार शकते. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येतात. वर्षभराच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या गाडीची अंतिम चाचणीही यशस्वी झाली आहे.

इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णूनगर येथे पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली वीस वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देतात. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? असा विचार त्यांच्या मनात आला आणि अशा पद्धतीची गाडी तयार करण्याच्या कल्पनेची ठिणगी पडली.

हे वाचलं का?

    follow whatsapp